अकोला: मुरुमाऐवजी रस्त्यावर टाकली काळी माती; रामकृष्ण नगरमधील नागरिकांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 06:30 PM2022-09-13T18:30:48+5:302022-09-13T18:31:38+5:30
मनपा प्रशासनाकडे कारवाइची मागणी
सचिन राऊत, अकाेला : काैलखेड परिसरातील रिजनल वर्कशाॅप समाेरील रामकृष्ण नगरमध्ये रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्याने त्यामध्ये मुरुमाऐवजी चक्क काळी माती टाकल्याचा प्रकार मंगळवारी समाेर आला़ काळी माती टाकल्याने तसेच त्यामध्ये पाणी साचल्याने या परिसरातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून ही काळी माती टाकणाऱ्यांवर मनपा प्रशासनाने कारवाइ करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे़श्रध्दा नगर ३ च्या पाठीमागे असलेल्या रामकृष्ण नगर परिसरात दाेन दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसामुूळे रस्त्यावर पाणी साचले आहे़ त्यामुळे नागरिकांनी या परिसरात मुरुम टाकण्याची मागणी केली असता प्रशासनाने मुरुमाऐवजी काळी मातीच टाकल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला़ या मातीमुळे नागरिकांना आता जाणे ऐणे कठीन झाले असून हा मुरुम टाकणाऱ्या संबधितांवर कारवाइ करण्याची मागणी रामकृष्ण नगर परिसरातील नागरिकांनी केली आहे़
मुरुम टाकणारा कोण
रामकृष्ण नगर परिसरात मुरुम टाकणारा काेण आहे असा सवाल उपस्थीत करण्यात येत आहे़ सामाजिक कार्यकर्त्यांनी हा मुरुम टाकल्याची प्राथमिक माहीती हाेती़ मात्र काही वेळानंतर हा मुरुम मनपा प्रशासनानेच टाकल्याचेही समाेर आले़ त्यामूळे मनपा प्रशासनाने नेमलेल्या कंत्राटदाराने मुरुमाऐवजी मातीच टाकणे सुुरु केले का असा सवाल उपस्थित करीत या परिसरातील नागरिाकांनी संबधितांवर कारवाइची मागणी केली आहे़