अकोला: व्यापाऱ्याला ग्राहक आयोगाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 06:33 PM2022-09-13T18:33:38+5:302022-09-13T18:34:18+5:30

या निर्वाळ्याने ठेवीदारांना आपल्या रकमेचे संरक्षण होते असा विश्वास निर्माण झाला आहे.

in akola consumer commission slaps trader | अकोला: व्यापाऱ्याला ग्राहक आयोगाचा दणका

अकोला: व्यापाऱ्याला ग्राहक आयोगाचा दणका

Next

सचिन राऊत, अकोला : हुंडीचिठ्ठित ठेवीसाठी पाच लक्ष रुपयांची रक्कम घेऊन त्या रकमेचे व्याज आणि मुद्दल देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अमरावतीच्या व्यापाऱ्याला अकोला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका देणारा निर्वाळा मंगळवारी दिला आहे. या निर्वाळ्याने ठेवीदारांना आपल्या रकमेचे संरक्षण होते असा विश्वास निर्माण झाला आहे.

अकोला शहरातील आळशी प्लॉटमधील रहीवासी विधी स्वप्निल शहा यांनी रंगनाथ एस चांडक, राहणार धनराज लेन, अमरावती यांना हुंडीचिट्ठीच्या ठेवी पोटी पाच लक्ष रुपयाची रक्कम दिली होती. ही रक्कम दिल्यानंतर त्या रकमेपोटी धनादेश देऊन आपल्या प्रतिष्ठाणाच्या लेटर पॅडवर शाह यांना हक्क ठेव पावती सुद्धा दिली होती. ज्यावर दरमहा एक रुपया वीस पैसे दराने व्याज देण्याचे ठरले होते. हा व्यवहार झाल्यानंतर चांडक याने विधी शाह यांना रकमेचे व्याज देणे थांबवले आणि मुद्दल रक्कम देण्यासाठी नकार दिला. 

चांडक याचा हा गैरव्यवहार विधी शाह यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे दाखल केला. यामध्ये तक्रारकर्त्या विधी शाह ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत संरक्षण क्षेत्रामध्ये येत असल्याने त्यांना आयोगाने दिलासा देत चांडक यांनी त्यांच्या ठेवीची रक्कम पाच लाख रुपये देय तारखेपासून दर साल दर शेकडा ८ टक्के व्याजदराने प्रत्यक्ष रक्कमदायेगी पर्यंत व्याजासहित देण्याचा आदेश दिला़ तसेच शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये व किरकोळ खर्च म्हणून तीन हजार रुपये असे निकाल लागल्यापासून ४५ दिवसाच्या आत देण्याचा आदेशही अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग एस. एम. उंटवाले आणि सदस्य सुहास आळशी यांनी दिला आहे़
 

Web Title: in akola consumer commission slaps trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला