रोहित्राची महाआरती करून वेधले महावितरणचे लक्ष; अकोल्यातील घटना

By Atul.jaiswal | Published: July 6, 2024 05:02 PM2024-07-06T17:02:41+5:302024-07-06T17:07:35+5:30

महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी माजी महापौर मदन भरगड यांनी शनिवारी सकाळी शेकडो नागरिकांसह विद्युत रोहित्राची महाआरती केली.

in akola electric transformer maha aarti by residence attracted the attention of mahavitaran | रोहित्राची महाआरती करून वेधले महावितरणचे लक्ष; अकोल्यातील घटना

रोहित्राची महाआरती करून वेधले महावितरणचे लक्ष; अकोल्यातील घटना

अतुल जयस्वाल, अकोला : वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असलेल्या गीता नगर परिसराला गोरक्षण फिडरऐवजी वाशिम बायपास फिडर वरून विद्युत पुरवठा व्हावा या स्थानिकांच्या मागणीनंतर कंत्राटदाराने विद्युत खांब बसवले, मात्र केबल न टाकल्याने दोन वर्षांपासून हे काम अर्धवट आहे. याकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी माजी महापौर मदन भरगड यांनी शनिवारी सकाळी शेकडो नागरिकांसह विद्युत रोहित्राची महाआरती केली.

गौरक्षण रोड फिडर वरून कैलास टेकडी, खदान व इतर अनेक भागात विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या फिडरवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. त्यामुळे दररोज कोणत्यातरी भागात बिघाड होत होता. परिणामी मानव शोरूम पासून हिंगणा मंदिर गीतनगर,स्नेहनगर,पोलीसवसाहत, अकोलिखुर्द, एमरॉल्ड कॉलोनी, रेणुका डुप्लेक्स,रूपचंद नगर, मातोश्रीनगर,हिंगणा, सोमठाना पर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. दररोज होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रासले आहेत. त्यांनी हा प्रश्न सोडविण्याची विनंती भरगड यांना केली होती. नंतर भरगड यांनी तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन नागरिकांची समस्या सांगितली. बच्चू कडू यांनी विद्युत खांब टाकून वाशिम बायपास फिडर वरून वीज पुरवठा देण्यासाठी निधीची तरतूद केली. वर्क ऑर्डर काढण्यात आली. वाशिम बायपास ते कलोरे कॉम्प्लेक्सपर्यंत विद्युत खांब उभारण्यात आले.

 मात्र, गेल्या दोन वर्षापासून केबल न टाकल्याने काम अर्धवटच आहे. अखेर सहनशीलता संपल्याने मदन भरगड यांच्या नेतृत्वात शनिवारी गीता नगर परिसरात रोहित्राची महाआरती करण्यात आली. या अनोख्या आंदोलनात राजेद्र चितलागे, गणेश कटारे , रघुनाथ खडसे, अभिषेक भरगड, गणेश कलसकर, रमेश जैन, सागर सरकटे, सुरेश कलोरे, वसंत तिवारी, अशोक अपुर्वा, अमीत शर्मा, मनोजित बागरेचा, सुशील बागरेचा,अमीत बागरेचा, कमल गट्टाणी, बालू पाटील, मुकेश अग्रवाल, अमोल यादव, चंद्रकांत अवतनकर, दुर्गेश ठाकुर, कुदंन ठाकुर, रितीक डोगंरे, संदीप कलोरे, शुभम अबूलकर, प्रमोद अठराले, अमोल तिहिले, मसाराम कोरडे, प्रकाश गवई श्रीकांत उसने, प्रमोद वेरूलकर, विनोद मराठे यांची उपस्थिती होती.

Web Title: in akola electric transformer maha aarti by residence attracted the attention of mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.