अकोटात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुफान; पोलीस बंदोबस्त तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 04:56 PM2024-07-01T16:56:23+5:302024-07-01T16:57:34+5:30

राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ या योजनेची नुकतीच घोषणा केली आहे.

in akola huge crowd to fill application for ladki bahini yojana police deployment | अकोटात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुफान; पोलीस बंदोबस्त तैनात

अकोटात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुफान; पोलीस बंदोबस्त तैनात

विजय शिंदे, अकोट (जि.अकोला) :राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ या योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी सेतू व तलाठी कार्यालयासमोर प्रचंड गर्दी झाली असून, अकोट शहरात गर्दी हाताबाहेर जात आहे. तलाठी कार्यालय, सेतू केंद्रात रांगाच रांगा लागल्या आहे. या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज भरण्यास १ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. या योजनेत महिलांना १५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. या योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कागदपत्र जमा करणे सुरू झाले आहे. अकोट शहरातील पोपटखेड रोड व जुन्या तहसील कार्यालयात दाखले मिळवण्यासाठी सेतू केंद्र व तलाठी कार्यालयात गर्दी झाली आहे.

Web Title: in akola huge crowd to fill application for ladki bahini yojana police deployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.