शेतकऱ्यांना दिलासा, जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता
By रवी दामोदर | Updated: June 19, 2024 17:03 IST2024-06-19T17:01:20+5:302024-06-19T17:03:49+5:30
अकोला जिल्ह्यात गत आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला. त्यानंतर काही भागात शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली, परंतू पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्या रखडल्या आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा, जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता
रवी दामोदर,अकोला: जिल्ह्यात गत आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला. त्यानंतर काही भागात शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली, परंतू पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्या रखडल्या. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.आता नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात दि.२३ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात मृगधारा बरसल्याने काही भागात पेरणी सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यातील बाळापूर, पातूर तालुक्यात पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. परंतू त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. दरम्यान, नागपूर येथील प्रादेशिक विभागाने दि.२३ जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तविली आहे.
झाडाखाली आश्रय घेऊ नका!
वीज व पावसापासून बचावाकरता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. वीज उपकरणे बंद ठेवावी. वीज पडण्याबाबत सूचना प्राप्त होण्यासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.