अकोल्यात कॉंग्रेसचा ‘रोटी बचाओ’ मोर्चा शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक
By रवी दामोदर | Published: March 14, 2023 06:11 PM2023-03-14T18:11:31+5:302023-03-14T18:11:38+5:30
केंद्र व राज्यातील भाजपा सरकाने सर्व सामान्यांचे रेशन बंद करण्याचा डाव आखला असून, जनतेचा रेशन धान्याचा हक्क काढुन घेण्याचा निर्णय परीपत्रकाद्वारे घेतल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
अकोला: केंद्र व राज्यातील भाजपा सरकाने सर्व सामान्यांचे रेशन बंद करण्याचा डाव आखला असून, जनतेचा रेशन धान्याचा हक्क काढुन घेण्याचा निर्णय परीपत्रकाद्वारे घेतल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. भाजपा सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अकोला जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने दि.१४ मार्च रोजी ‘रोटी बचाओ जनआंदोलन’ मोर्चा काढण्यात आला. शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.
याप्रसंगी ‘रेशन आमचे हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘देश सामान्य जनतेचा, नाही कुणाच्या मालकीचा’अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता. सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळेपर्यंत जनआंदोलन सुरूच राहील, असे यावेळी सांगण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व कॉंग्रेस नेते श्याम उमाळकर यांनी केले. या मोर्चात कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, कॉंग्रेस नेते प्रकाश तायडे, विवेक पारसकर, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेश गणगणे व कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष प्रमोद खंडारे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करून पुढील चर्चेसाठी आमंत्रण दिले. या मोर्चात विजय देशमुख, तशवर पटेल, अतुल अमानकर, अफरोझ खान पठाण, अन्नपूर्णा पाटील, कैलाश पाटील, अंकुश देशमुख, जितेंद्र गुल्हाने, अश्रफ पटेल, रमेश बेटकर, विशाल इंगळे, राजेश नळकांडे, अतुल राहणे, सागर गावंडे, प्रकाश वाकोडे आदींचा सहभाग होता.