अकोल्यात पतीच्या डाेळयादेखत पत्नी रेल्वेतून पडली

By राजेश शेगोकार | Published: April 13, 2023 05:21 PM2023-04-13T17:21:37+5:302023-04-13T17:22:24+5:30

दाम्पत्य चकून अकाेटकडे जाणाऱ्या गाडीत बसले अन् आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आल्यावर सुरू झालेल्या गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न करू लागले असताना पतीच्या देखत पत्नी रेल्वेच्या दरवाज्यातून खाली पडली.

In Akola, the wife fell from the train under the care of her husband | अकोल्यात पतीच्या डाेळयादेखत पत्नी रेल्वेतून पडली

अकोल्यात पतीच्या डाेळयादेखत पत्नी रेल्वेतून पडली

googlenewsNext

अकाेला : वाशीमला जाण्यासाठी अकाेला रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ५ वर गाडीच्या प्रतीक्षेत असलेले एक दाम्पत्य चकून अकाेटकडे जाणाऱ्या गाडीत बसले अन् आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आल्यावर सुरू झालेल्या गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न करू लागले असताना पतीच्या देखत पत्नी रेल्वेच्या दरवाज्यातून खाली पडली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.

अकोला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवर भिमराव इंगळे (६० आणि त्यांच्या पत्नी नंदाबाई भिमराव इंगळे (५५ )  हे पती-पत्नी वाशिम जाण्यासाठी रेल्वेची प्रतिक्षा करीत होते. त्यानंतर याच फलाटावर अकोटकडे जाण्यासाठी रेल्वे लागली, दोघेही गाडीत चढले अन् थोड्या वेळानंतर आपण चुकीच्या गाडीत बसलो आहाेत याची जाणीव झाल्याने त्यांनी रेल्वेतून उतरण्याची धडपड सुरू केली. यादरम्यान गाडी सुरू झाली हाेती. दाेघांनीही धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला. पण उतरत असताना नंदाबाई यांचा तोल गेला अन् त्या दरवाज्यातून खाली कोसळल्या. हे पाहताच पत्नीला वाचवण्यासाठी पतीने रेल्वेतून खाली उडी घेतली, मात्र नंदाबाई रेल्वे आणि फलाटाच्या मधोमध कोसळल्याने त्यांच्या डोक्यावरून रेल्वेचं चाक गेलं अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत भीमराव किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रेल्वेखालून बाहेर काढला.

Web Title: In Akola, the wife fell from the train under the care of her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला