बंडखोर आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात, मिटकरींनी सांगितला राष्ट्रवादीचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 04:17 PM2022-08-31T16:17:12+5:302022-08-31T16:17:19+5:30

राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे

In contact with rebel MLA of shinde group in Jayant Patal, Amol Mitkari told NCP's plan | बंडखोर आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात, मिटकरींनी सांगितला राष्ट्रवादीचा प्लॅन

बंडखोर आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात, मिटकरींनी सांगितला राष्ट्रवादीचा प्लॅन

googlenewsNext

अकोला/मुंबई - देशभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून यंदा कोरोनानंतरच्या दोन वर्षांनी थाटात, वाजत-गाजत गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्यातील घराघरात गणपत्ती बाप्पा विराजमान झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरीची गणरायाचं आगमन झालं आहे. या आगमन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय चर्चांबद्दल राष्ट्रवादीची भूमिका सांगितली. तसेच, बंडखोर आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचंही ते म्हणाले. 

राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करत शिंदे गटासमोर नवे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून, शिवसेनेतील बंडखोर आमदारांना टार्गेट करून त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेण्याची नवी रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे हे प्लॅनिंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मदत करण्यासाठी आहे की, डाव उलटवण्यासाठी आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं दिसून येते. याबाबत बोलताना अमोल मिटकरी यांनी प्लॅन सांगितला. 

'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या जयघोषात राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरा गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर राष्ट्रवादीत आणन्यासाठी राष्ट्रवादीने प्लॅन आखल्याच्या चर्चा सुरु आहेत. हा नेमका काय आहे? या संदर्भात मिटकरी यांना विचारले असता, असे लोक आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचे मिटकरी यांनी सांगितले. 

राज ठाकरेंची भेट, खडसेंचं विधान

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासस्थानी जात भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अशातच भविष्यात राजकारणात काहीही होऊ शकतं असं विधान राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी केले आहे. 
 

Web Title: In contact with rebel MLA of shinde group in Jayant Patal, Amol Mitkari told NCP's plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.