बारावीच्या परीक्षेत अकोल्यात यंदाही मुलीच हुश्शार! अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.३७ टक्के
By नितिन गव्हाळे | Published: May 21, 2024 04:23 PM2024-05-21T16:23:13+5:302024-05-21T16:25:21+5:30
मुलींची टक्केवारी ९५.४९ टक्के.
नितीन गव्हाळे, अकोला : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीचा निकाल २१ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलीच वरचढ ठरल्या आहेत.
अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. गतवर्षी मुलींचा निकाल ९४.७० टक्के होता तर यावर्षी ९५.४९ टक्के निकाल लागला आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.४९ टक्के आहे.