निमकर्दा ते कळंबा पायदळ वारी रस्त्याचा दिंडी मार्गात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:17 AM2021-02-07T04:17:43+5:302021-02-07T04:17:43+5:30
पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा,अकाेला व वाशिम या तीन जिल्ह्यात ७०० काेटी रुपयांतून हायब्रिड ॲन्युइटी माॅडेल (हॅम) अंतर्गत प्रशस्त रस्त्याच्या कामाला ...
पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा,अकाेला व वाशिम या तीन जिल्ह्यात ७०० काेटी रुपयांतून हायब्रिड ॲन्युइटी माॅडेल (हॅम) अंतर्गत प्रशस्त रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून यामध्ये शेगाव ते अकाेला ते वाशिम या प्रमुख दिंडी मार्गाचा समावेश आहे. शेगाव ते नागझरी तसेच पारस ते गायगाव असा दिंडी मार्ग तयार केला जाणार असला तरी यामधून नागझरी ते कळंबा ते अडाेशी-कडाेशी हा रस्ता वगळण्यात आला आहे. त्यामुळे ‘हॅम’अंतर्गत तयार हाेणाऱ्या दिंडी मार्गामध्ये कळंबा ते अडाेशी कडाेशी ते निमकर्दा रस्त्याचा समावेश करण्याची मागणी शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिवांकडे केली आहे.
सचिवांनी दिले निर्देश
पायदळ वारी रस्त्याचे महत्व लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी पत्राची दखल घेत या विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निर्देश जारी केले आहेत. ‘हॅम’अंतर्गत शासनाने तरतूद केलेल्या निधीतून हा रस्ता प्रस्तावित केल्यास ताे तातडीने मार्गी लागेल,अशी अपेक्षा आ.नितीन देशमुख यांनी व्यक्त केली आहे.