तीन सराफा प्रतिष्ठानांवर ‘आयकर’च्या धाडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:02 AM2017-09-08T02:02:49+5:302017-09-08T02:03:27+5:30
अकोला : शहरातील बड्या हस्तींच्या तीन ज्वेलर्सच्या प्रतिष्ठानांवर अकोला आयकर खात्याकडून गुरुवारी दु पारी छापेमारी करण्यात आली. त्याचवेळी बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव व मलकापूर येथील ज्वेलर्सवरही छापेमारी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील बड्या हस्तींच्या तीन ज्वेलर्सच्या प्रतिष्ठानांवर अकोला आयकर खात्याकडून गुरुवारी दु पारी छापेमारी करण्यात आली. त्याचवेळी बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव व मलकापूर येथील ज्वेलर्सवरही छापेमारी करण्यात आली.
अकोल्यातील सिंधी कॅम्पमधील रहिवासी प्रकाश अलिमचंदानी आणि नंदकुमार अलिमचंदानी यांच्या मालकीचे पुनम ज्वेलर्स, संतोष खंडेलवाल यांच्या मालकीचे खंडेलवाल आभूषण केंद्र, राहुल भगत यांच्या मालकीचे भगत ज्वेलर्स या तीन ज्वेलर्सवर अकोला आयकर खात्याच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापे घातले. त्यानंतर या तीनही प्रतिष्ठानांमधून खरेदी-विक्री करण्या त आलेल्या दागिन्यांच्या देयकासह अन्य व्यवहारांच्या दस्तावेजांची तपासणी करण्यात आली. शहरातील तीन मोठय़ा सराफांवर छापेमारी झाल्यानंतर सराफा बाजारात खळबळ माजली होती. नोटाबंदीनंतर अकोल्यातील दोन प्रतिष्ठानांवर आयकर खात्याने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता १0 महिन्यांचा कालावधी उलटल्यावर अकोला आयकर खात्याच्या तीन पथकांनी पुनम ज्वेलर्स, भगत ज्वेलर्स व खंडेलवाल आभूषण केंद्र येथे छापेमारी करीत दस्तावेजांची तपासणी सुरू केली . या त पासणीनंतर या तीन ज्वलेर्समधून झालेल्या व्यवहारांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आयकर खात्याच्या अधिकार्यांनी दिली. या छापेमारीत दस्तावेज ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती.
एकाचवेळी धाडी
शहरातील या तीनही सराफांवर अकोला आयकर प थकाने एकाचवेळी धाडी टाकल्या. तीन ते चार प थकांकडून या धाडी घालण्यात आल्याची माहिती आहे. सराफा बाजार बुधवारी बंद असतो. त्यामुळे सराफा बाजारातील आठवड्याचा पहिलाच दिवस असलेल्या गुरुवारी ही छापेमारी करण्यात आली.
खामगाव, मलकापूरमध्ये छापे
खामगाव शहरातील दोन ज्वेलर्स प्रतिष्ठानांवर बुलडाणा आयकर पथकाकडून छापेमारी करण्यात आली, तर मलकापूरमध्येही आयकर खात्याने छापेमारी केली आहे. अकोला व बुलडाणा जिल्हय़ात एकाचवेळी छापेमारी करण्यात आली असून, दस्तावेज तपासणीनंतर ते जप्त केल्याची माहिती आहे.
तीन दिवस चालणार झाडाझडती
शहरातील बड्या हस्तींच्या तीन ज्वेलर्सच्या दस् तावेजांच्या तपासणीसह व्यवहारांची झाडाझडती तब्बल दोन दिवस चालणार असल्याचे संकेत आयकर खा त्याच्या अधिकार्यांनी दिले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवून त्यानंतरच कारवाई करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहि ती आहे.
-