जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक टपाल ‘ऑनलाइन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 10:57 AM2020-01-24T10:57:10+5:302020-01-24T10:57:29+5:30

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक विभागामध्ये प्राप्त होणारी टपालच्या नोंदी आता ‘आॅनलाइन’ करण्यात येणार आहे.

 Incoming outgoing post from Akola Collector's Office now 'online'! | जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक टपाल ‘ऑनलाइन’!

जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक टपाल ‘ऑनलाइन’!

Next

- संतोष येलकर

अकोला : प्रलंबित कामे आणि नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक रजिस्टरमधील टपालच्या नोंदी ‘आॅनलाइन’ करण्याचा अभिनव उपक्रम १ फेबु्रवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक-जावक विभागामध्ये प्रशासकीय कामांसह जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात टपाल प्राप्त होते. प्राप्त अर्ज, तक्रारी आणि निवेदनांच्या नोंदी आवक-जावक रजिस्टरमध्ये घेण्यात येतात. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक विभागामध्ये प्राप्त होणारी टपालच्या नोंदी आता ‘आॅनलाइन’ करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘आवक-जावक सॉफ्टवेअर प्रणाली’ १ फेबु्रवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक करण्यात आली आहे. आवक-जावक सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होणारी टपाल आॅनलाइन पद्धतीने संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. आॅनलाइन पद्धतीने कर्मचाºयांकडे पाठविण्यात आलेल्या टपालपैकी किती निकाली काढण्यात आल्या आणि किती प्रलंबित आहे, यासंबंधीची सर्व माहिती आवक-जावक टपाल सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाला तातडीने मिळणार आहे. तसेच प्रशासकीय कामांसह नागरिकांच्या तक्रारी निकाली काढण्याच्या कामावर नियंत्रण ठेवता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १ फेबु्रवारीपासून सुरू होत असलेल्या या अभिनव उपक्रमाद्वारे प्रलंबित प्रशासकीय कामांसह नागरिकांच्या तक्रारी निकाली काढण्याच्या कामाला गती मिळणार आहे.

‘सॉफ्टवेअर’ प्रणालीचे कर्मचाºयांना प्रशिक्षण!
जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक टपाल १ फेबु्रवारीपासून आॅनलाइन करण्यात येणार आहे. त्यासाठी २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध विभागातील कर्मचाºयांना ‘आवक-जावक टपाल सॉफ्टवेअर प्रणाली’ हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

 

Web Title:  Incoming outgoing post from Akola Collector's Office now 'online'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला