श्री शिवजयंतीचा अपूर्ण उल्लेख व निंदनीय शब्दांचा वापर बालभारतीने थांबवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:18 AM2021-04-07T04:18:50+5:302021-04-07T04:18:50+5:30
बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठी आवृत्तीतील प्रस्तावनेतील वाक्य इतिहास विषय समिती, चित्रकार, छायाचित्रकार यांनी अतिशय आस्थेने आणि परिश्रमपूर्वक हे पुस्तक ...
बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठी आवृत्तीतील प्रस्तावनेतील वाक्य इतिहास विषय समिती, चित्रकार, छायाचित्रकार यांनी अतिशय आस्थेने आणि परिश्रमपूर्वक हे पुस्तक तयार केले आहे. याचे इंग्रजी आवृत्तीत भाषांतर केले आहे. यामध्ये आस्थेने या शब्दाचे भाषांतर करण्यात आलेले नाही, तसेच परिश्रमपूर्वकसाठी ग्रेट पेईन्स हे अत्यंत चुकीचे व निंदनीय शब्द वापरले आहेत. ग्रेट पेईन्स या शब्दाचा अर्थ काही वेगळाच निघतो. श्री शिवजयंतीचा अर्थात शिवजन्म दिनांकाचा उल्लेख मराठी आवृत्तीत फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० असा आहे. याचे इंग्रजी आवृत्तीत भाषांतर फाल्गुन वद्य तृतीया १५५१ शक (१९ फेब्रुवारी १६६०) असे केले आहे. यामध्ये इंग्रजी वर्षाप्रमाणे या शब्दाचे भाषांतर करण्यात आले नाही. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार ही तारीख असल्याचा कुठेही उल्लेख नाही. याबाबत शासनाने त्वरित निर्णय घेऊन चूक दुरुस्त करावी, असे निवेदनात म्हटले आहे.