सवरेपचारमध्ये असुविधा; ‘प्रहार’चा अधिष्ठातांच्या  कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 08:03 PM2017-08-18T20:03:06+5:302017-08-18T20:05:37+5:30

अकोला : पश्‍चिम वर्‍हाडचे ट्रामा केअर सेंटर, अशी  ओळख असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात रुग्णालयांना  सुविधा उपलब्ध नसल्याच्या मुद्यावरून प्रहार जनशक्ती  पक्षातर्फे बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या  अधिष्ठातांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ये त्या दहा दिवसांत मागण्यांची पूतर्ता न झाल्यास पुन्हा तीव्र  आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

Inconvenience in fashion; Strike at the 'Prahar' governing office | सवरेपचारमध्ये असुविधा; ‘प्रहार’चा अधिष्ठातांच्या  कार्यालयात ठिय्या

सवरेपचारमध्ये असुविधा; ‘प्रहार’चा अधिष्ठातांच्या  कार्यालयात ठिय्या

Next
ठळक मुद्देएमआरआय मशीन लवकर सुरू करावीदिव्यांग बांधवांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात  यावेमागण्यांची पूतर्ता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पश्‍चिम वर्‍हाडचे ट्रामा केअर सेंटर, अशी  ओळख असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात रुग्णालयांना  सुविधा उपलब्ध नसल्याच्या मुद्यावरून प्रहार जनशक्ती  पक्षातर्फे बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या  अधिष्ठातांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ये त्या दहा दिवसांत मागण्यांची पूतर्ता न झाल्यास पुन्हा तीव्र  आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक सोयी  असल्याने येथे पश्‍चिम वर्‍हाडासह मराठवाड्यातूनही रुग्ण  भरती होतात. मात्र, शासन यासाठी कोट्यवधी रुपये खर्च  करीत असले, तरी याचा लाभ रुग्णांना मिळत नाही. येथील  कर्मचारी रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांशी  व्यवस्थित बोलतही नाहीत. याकडे प्रशासनही दुर्लक्ष करीत  असल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाने बुधवारी  थेट अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या कक्षात धाव घे तली. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागण्यात ता तडीने पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी पक्षाचे नेते  श्याम राऊत, सुहास साबे, नीलेश ठोकळ, सोपान कुटाळे,  मोईन अली, संदीप पाटील, अतुल काळणे, कुणाल  जाधव, शरद पवार, मंगेश गणेशकर आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या
एमआरआय मशीन लवकर सुरू करावी, दिव्यांग बांधवांना  अपंगत्वाचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे, कर्णबधीर  दिव्यांगांच्या सेवेसाठी बेरा मशीन कायम सुरू ठेवावी,  रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणा सुरू करावी आदी  मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Web Title: Inconvenience in fashion; Strike at the 'Prahar' governing office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.