शेतकऱ्यांची गैरसोय टळली; सातबारा मिळतोय आता एका क्लिकवर
By Atul.jaiswal | Published: April 13, 2023 01:10 PM2023-04-13T13:10:25+5:302023-04-13T13:11:10+5:30
शासनाने सात-बाऱ्यासाेबतच आठ-अ उतारा, फेरफार उतारा, मिळकत पत्रिका आता ऑनलाईन केले आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांना एका क्लिकवर ही कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत.
अकोला : यांत्रिक युगात कामे सोयीस्कर झाली असून, नागरिकांचे परिश्रम वाचले आहेत. आता जमिनीच्या सात-बाऱ्यासह आठ-अ उतारा, फेरफार उतारा, मिळकत पत्रिका आता ऑनलाईन मिळत आहे. शासकीय कार्यालयांत शेतकऱ्यांना फेऱ्या मारण्याची वेळ येऊ नये, त्यांचा वेळ व पैशांची बचत व्हावी, यासाठी आता विविध कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे घरबसल्या सात-बारा, आठ-अ उतारा काढता येत आहे.
शासनाने सात-बाऱ्यासाेबतच आठ-अ उतारा, फेरफार उतारा, मिळकत पत्रिका आता ऑनलाईन केले आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांना एका क्लिकवर ही कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन दाखले घेण्यासाठी १५ ते ५० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. डिजिटल स्वाक्षरीसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते.
ऑनलाईन सुविधेमुळे गैरसोय टळली
विविध कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टळली आहे. एखाद्या कागदपत्रासाठी शेतकऱ्यांना तासनतास थांबावे लागत हाेते. आता एका क्षणात ऑनलाईन कागदपत्रे उपलब्ध होत आहेत.