हवेच्या प्रदूषणात वाढ; तातडीने उपाययाेजना करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:49+5:302021-07-20T04:14:49+5:30

शहरांमधील वाढती लाेकसंख्या, वाहनांचा वापर, इमारतींचे निर्माण करताना हाेणारी वृक्षताेड यात भरीस भर सिमेंट रस्त्यांचे विणलेले जाळे व झपाट्याने ...

Increase in air pollution; Take immediate action! | हवेच्या प्रदूषणात वाढ; तातडीने उपाययाेजना करा!

हवेच्या प्रदूषणात वाढ; तातडीने उपाययाेजना करा!

Next

शहरांमधील वाढती लाेकसंख्या, वाहनांचा वापर, इमारतींचे निर्माण करताना हाेणारी वृक्षताेड यात भरीस भर सिमेंट रस्त्यांचे विणलेले जाळे व झपाट्याने हाेणाऱ्या औद्याेगिकीकरणामुळे हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. धुळीने माखलेले रस्ते व वाहनांमधील धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार जडत आहेत. शहरांमधील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय ठरत असून, यामुळे पर्यावरणाचा समताेल ढासळत चालल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरणातील बदल मंत्रालयाने राज्य शासनाला पत्रव्यवहार केला. प्राप्त पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांनीही शासनासाेबत प्रदूषित हवेच्या संदर्भात पत्रव्यवहार केला. यामध्ये राज्यात दहा लाखांपेक्षा अधिक लाेकसंख्या असलेल्या शहरांमधील हवेच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी १५व्या वित्त आयाेगातून निधी खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Web Title: Increase in air pollution; Take immediate action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.