पिंजर परिसरात ब्लॅक फंगसच्या रुग्णांत वाढ, नागरिकांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:15 AM2021-06-25T04:15:16+5:302021-06-25T04:15:16+5:30

परिसरातील काही रुग्ण शासकीय रुग्णालयात थेट जात आहेत, तर काही खासगी दवाखान्यात जात असल्यामुळे पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ब्लॅक ...

Increase in black fungus patients in cage area, fear among citizens | पिंजर परिसरात ब्लॅक फंगसच्या रुग्णांत वाढ, नागरिकांमध्ये भीती

पिंजर परिसरात ब्लॅक फंगसच्या रुग्णांत वाढ, नागरिकांमध्ये भीती

Next

परिसरातील काही रुग्ण शासकीय रुग्णालयात थेट जात आहेत, तर काही खासगी दवाखान्यात जात असल्यामुळे पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णाची नोंद नाही. जवळच्या खेरडा खुर्द, निंबी येथे ब्लॅक फंगसची लागण झाल्याची माहिती आहे. काही रुग्ण उपचार करून घरी परतले, तर काही खासगी किंवा सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार करीत आहेत. रुग्णांनी घाबरून न जाता शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ब्लॅक फंगस आजारावर सर्वोपचार रुग्णालयात व्यवस्थित उपचार होतो. पिंजर परिसरातील रुग्णांनी पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार करून घ्यावा.

- डॉ. शरयू बिहाडे, वैद्यकीय अधिकारी पिंजर

Web Title: Increase in black fungus patients in cage area, fear among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.