ग्रामीण भागात काेराेना चाचण्या वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:29 AM2021-05-05T04:29:31+5:302021-05-05T04:29:31+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात साेमवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री ठाकूर बोलत होत्या. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी ...

Increase carina tests in rural areas | ग्रामीण भागात काेराेना चाचण्या वाढवा

ग्रामीण भागात काेराेना चाचण्या वाढवा

Next

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात साेमवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री ठाकूर बोलत होत्या. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ.घोरपडे, डॉ.सिरसाम, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, माजी आमदार बबनराव चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या आशा मिरगे आदी उपस्थित होते.

ठाकूर यांनी कोरोना रुग्णस्थिती, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा याबाबत माहिती घेतली. जिल्ह्यातील कोविड रुग्णाची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णाकरिता बेड तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवावी,असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. जिल्ह्यातील ऑक्सिजन उपलब्धता, आवश्यक मागणी याबाबत माहिती सादर करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होईल, असे नियोजन करावे, अशा सूचना संबंधितांना दिल्या. तिसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात शेतीच्या पुढील हंगामात कोरोना फैलाव रोखण्यासाठी आताच प्रशासनातील तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कोतवाल या यंत्रणेच्या सहाय्याने सज्ज रहावे असे निर्देश त्यांनी दिले.

00000000

महिला व अनाथ बालकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा

ज्या बालकांना आई-वडील नाही अशा अनाथ बालकांना प्रमाणपत्र मिळवून द्यावे. तसेच जिल्ह्यातील सर्व अनाथ बालकांना रेशनकार्ड उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश मंत्री ठाकूर यांनी संबंधित विभागाला दिले. कोविडमुळे आई व वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्या पालनपोषणाकरिता नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कोरोना काळात महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे केलेल्या उपक्रमाची माहिती सादर करण्यात आली. महिला बचत गटांना अधिक बळकट करण्यासाठी नवीन उपक्रमांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महिला आर्थिक विकास महामंडळाला दिल्या.

Web Title: Increase carina tests in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.