पातूर तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:33 AM2021-03-04T04:33:36+5:302021-03-04T04:33:36+5:30
आठवडाभरात विशेष मोहिमेअंतर्गत ७०० हून अधिक नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यामध्ये आरटीपीसीआर रॅपिड टेस्टद्वारा दहा दिवसांमध्ये १४२ पॉझिटिव्ह ...
आठवडाभरात विशेष मोहिमेअंतर्गत ७०० हून अधिक नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यामध्ये आरटीपीसीआर रॅपिड टेस्टद्वारा दहा दिवसांमध्ये १४२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोना रुग्णांची झपाट्याने होत असलेली वाढ पाहता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी नागरिकांची बेफिकिरी मात्र कायम आहे. त्यामुळे तालुका प्रशासन विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. मंगळवारी दोनशेहून अधिक नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. पातूर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोमवारपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त आणि साठ वर्षांवरील वयोवृद्धांना नोंदणीनंतर कोरोना लस दिली जात आहे. दोन दिवसांच्या कालावधीमध्ये सोमवारी १५ आणि मंगळवारी २३ याप्रमाणे ३८ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे.