अकोल्यात सर्दी आणि खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:05 AM2017-11-28T01:05:17+5:302017-11-28T01:14:54+5:30
रात्रीचा किमान पारा घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वा तावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. खासगींसह शासकीय रूग्णालयांतही रूग्णांची वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रात्रीचा किमान पारा घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वा तावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. खासगींसह शासकीय रूग्णालयांतही रूग्णांची वाढत आहे.
येथील सर्वोपचार रूग्णालयांसह शहरातील शेकडो दवाखाने व क्लिनिकमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे ताप दोन दिवस राहत असेल तर आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
अशा वातावरणात डासांची उत्पत्तीदेखील वेगाने होत असल्याचे कीटक तज्ज्ञांचे मत आहे. मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारातही वाढ झाली असून या आजाराचे संशयीत रूग्ण आढळले आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेला सर्तक राहणे गरजेचे आहे.
तापामध्ये जर दूषित पाणी पिण्यात आल्याने टायफाईड, अतिसार यासारख्या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे योग्यवेळी शरीराची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळा हा इतर ऋतीच्या तुलनेत सर्व जीवसृष्टीला पोषक मानला जातो. मात्र, अचानक वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, थंडीची तीव्रता वाढल्याने वृध्दांना सांधेदुखी, वात, दम्याच्या आराजाने डोके वर काढले आहे. मणक्यांचा त्रास या दिवसाचा वाढत असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ अमोल रावणकार यांनी सांगितले.
काय आहे व्हायरल इनफेक्शन ?
व्हायरल इन्फेक्शन हा सर्वांमध्ये कॉमन आढळणारा आजार आहे. अनेक प्रकारच्या विषाणूंपासून होणारे आजार म्हणजे व्हायरल इन्फेक्शन तो मानवाच्या शरीराच्या कुठल्याही भागाला होऊ शकते. विषाणूजन्य आजारामध्ये ताप येते. व तो कमी जास्त प्रमाणात चढउतार राहु शकतो. लहान मुलांमध्ये या आजाराची लागण लवकर होत असल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांनी स् पष्ट केली आहे.