सुट्यांच्या दिवशी कोविड चाचण्या वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:42+5:302021-04-17T04:17:42+5:30

अकोला: जिल्हयातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी कोविड चाचण्या वाढविण्याचे नियोजन ...

Increase covid tests on holidays! | सुट्यांच्या दिवशी कोविड चाचण्या वाढवा!

सुट्यांच्या दिवशी कोविड चाचण्या वाढवा!

Next

अकोला: जिल्हयातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी कोविड चाचण्या वाढविण्याचे नियोजन करुन अधिकाधिक लोकांच्या चाचण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण तसेच क्षेत्रियस्तरावरील अधिकारी सहभागी झाले होते.

कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या मुद्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. रुग्ण वेळीच चाचणी करीत नाहीत, तात्पुरते उपचार करीत चालढकल करतात; मात्र रुग्णांनी वेळीच रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांच्या चाचण्या (आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन) करुन कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांवर कोविडचे उपचार सुरु करण्यात यावेत. तसेच रुग्णांना तात्काळ कोविड रुग्णालयात दाखल करावे. यासाठी स्थानिक पातळीवर पथके गठित करुन कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या.

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करा!

संचारबंदी काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. मास्क विना फिरणारे, सामाजिक अंतर न राखणाऱ्यांवरही कारवाई करावी. तसेच गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

‘रेमडेसिविर’चा गैरवापर होत

असल्यास तपासणी पथके गठित करा!

जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयांत उपलब्ध खाटांची संख्या याबाबत समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता आणि या इंजेक्शनचा गैरवापर होत असल्यास तपासणीसाठी पथके स्थापन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: Increase covid tests on holidays!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.