महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्तांच्या मानधनात ६ हजार रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 03:39 PM2019-02-02T15:39:23+5:302019-02-02T15:39:34+5:30

अकोला : महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्त असलेल्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रती महिना ६ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशिक्षणार्थींच्या मागणीनुसार हा निर्णय घेतला आहे.

The increase in the honorarium of the project affected people by Rs. 6 thousand | महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्तांच्या मानधनात ६ हजार रुपयांची वाढ

महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्तांच्या मानधनात ६ हजार रुपयांची वाढ

Next

अकोला : महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्त असलेल्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रती महिना ६ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशिक्षणार्थींच्या मागणीनुसार हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ १५०० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना होणार आहे.
महानिर्मितीत पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांना आयटीआय नंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून समावून घेण्यात येते. सध्या आयटीआय प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना सुरूवातीच्या ३ वषार्साठी ८००० रुपये आणि ३ वषार्पेक्षा अधिक कालावधी झाल्यानंतर १०,००० रुपये विद्यावेतन देण्यात येते. प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना दरवर्षी ५०० रुपये वेतनवाढ देण्यात येते.
आयटीआयधारक प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांप्रमाणे किमान वेतन मिळण्याची विनंती ऊजार्मंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार ही मागणी मान्य करण्यात आली. महानिर्मितीत कुशल, अर्धकुशल व अकुशल अशी वर्गवारी करण्यात येते.
प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून ५ वर्षा पेक्षा अधिक कालावधीची सेवा झाली असलेल्या प्रशिक्षणाथीर्ला सध्या १०,००० रुपये मानधन मिळते. त्यात वाढ करण्यात येऊन १६ हजार करण्यात आले. दोन ते पाच वर्ष सेवा झालेल्या प्रशिक्षणाथीर्ला सध्या ९००० रुपए मिळत होते. त्यात वाढ करून हे मानधन १५००० रुपये करण्यात आले. दोन वर्षापर्यंत सेवा कालावधी झालेल्या प्रशिक्षणापर्यंत आतापर्यंत ८००० रुपए मानधन देण्यात येत होते. आता ते १४ हजार रुपये करण्यात आले.

२ कोटी २३ लाख होणार खर्च
एकूण १५०० प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रत्येकी ६ हजार रुपये वाढ करण्यात आली. ५ वर्षांपेक्षा अधिक सेवा असणारे प्रशिक्षणार्थी २३५ आहेत. दोन व पाच वर्षाच्या कालावधीत सेवा देणारे ७५९ प्रशिक्षणार्थी आहेत. दोन वर्षे सेवेत असणारे प्रशिक्षणार्थी ५१८ आहेत. या सर्व प्रशिक्षणार्थींच्या मानधनावर सध्या १ कोटी ३३ लाख रुपये खर्च होत होता. तो आता २ कोटी २३ लाख रुपयांवर जाणार आहे.

Web Title: The increase in the honorarium of the project affected people by Rs. 6 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.