संपर्क तपासणीसह चाचण्यांचे प्रमाण वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:35 AM2021-02-21T04:35:40+5:302021-02-21T04:35:40+5:30

महिनाभराचा काळ कसोटीचा आगामी महिनाभराचा काळ हा कसोटीचा आहे. त्यामुळे सर्व यंत्रणेने अतिशय सतर्क राहणे आवश्यक आहे. ...

Increase the number of tests with contact checks | संपर्क तपासणीसह चाचण्यांचे प्रमाण वाढवा

संपर्क तपासणीसह चाचण्यांचे प्रमाण वाढवा

googlenewsNext

महिनाभराचा काळ कसोटीचा

आगामी महिनाभराचा काळ हा कसोटीचा आहे. त्यामुळे सर्व यंत्रणेने अतिशय सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या सुपर स्प्रेडर व्यक्ती, रुग्णसंख्या अधिक असलेला परिसर, सहव्याधी असणारे ज्येष्ठ नागरिक, पॉझिटीव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील तसेच त्यांच्या संपर्क साखळीतील लोकांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे. दिवसाला किमान २४०० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या हातावर शिक्के

होम आयसोलेशन मधील रुग्णांची ओळख पटावी, या दृष्टिकोनातून त्यांच्या हातावर शिक्के मारण्याचेही निर्देश त्यांनी बैठकीत दिले. तसेच त्यांच्या प्रकृतीचे नियमीत निरीक्षण आणि त्यांच्या औषधोपचाराचा पाठपुरावा झालाच पाहिजे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. संदिग्ध रुग्णांचे रॅपिड चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यावरही त्यांचा पाठपुरवा करून त्यांना निरीक्षणात ठेवण्याबाबत सुचना देण्यात आल्यात.

Web Title: Increase the number of tests with contact checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.