डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ; नागरिक हैरान

By admin | Published: November 16, 2014 12:50 AM2014-11-16T00:50:40+5:302014-11-16T00:50:40+5:30

अकोला शहरात स्वच्छतेचा अभाव, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष.

Increase in the origin of mosquitoes; Citizens are shocked | डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ; नागरिक हैरान

डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ; नागरिक हैरान

Next

अकोला : राज्यात सर्वत्र डेंग्यूचा उद्रेक असताना डासांच्या उत्पत्तीवर प्रतिबंध घालण्यासाठी मनपाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजना अत्यंत तोकड्या सिद्ध ठरत आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डासांची उत्पत्ती करणार्‍या खदानींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शहरात हिवताप व डेंग्यूसदृष्य आजाराची साथ पसली आहे. डेंग्यूचा धस्का घेत नागरिकांनी परिसर स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून पावले उचलण्यास प्रारंभ केला असला तरी डासांचा उद्रेक कमी होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहर स्वच्छता व डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी मनपाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना तोकड्या सिद्ध ठरत आहेत.
सिंधी कॅम्प-खदान, आदर्श कॉलनी, बलोदे लेआऊट सारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खदानींमध्ये पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यात पाणवनस्पती उगविली असून, लगतच्या वसत्यांमधील सांडपाणी व कचरा देखील त्यात येऊन पडतो. परिणामी, परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते. ह्यबडी-खदानह्ण, ह्यवाठूरकर-खदानह्ण, ह्ययुसुफअली-खदानह्ण, ह्यनुरानी-खदानह्ण अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या या खदानींमध्ये साचलेल्या घाण पाण्यात डासांची मोठय़ा प्रमाणावर उत्पत्ती होते. ४ वर्षांपूर्वी मनपाने खरेदी केलेल्या २८ फॉगिंग मशिनपैकी आज रोजी केवळ चार फॉगींग मशिन सुरू आहेत. ३६ प्रभागांसाठी चार मशिन तोकड्या पडत आहेत.

Web Title: Increase in the origin of mosquitoes; Citizens are shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.