मुंडगाव येथे सर्दी, खोकल्यासह व्हायरल फिव्हरच्या रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:41+5:302021-09-26T04:21:41+5:30
मुंडगाव : सततच्या बदलत्या वातावरणामुळे मुंडगाव येथे सर्दी, खोकल्यासह व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आरोग्य विभागाने व ग्रामपंचायत ...
मुंडगाव : सततच्या बदलत्या वातावरणामुळे मुंडगाव येथे सर्दी, खोकल्यासह व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आरोग्य विभागाने व ग्रामपंचायत विभागाने लक्ष देऊन परिसरात रुग्णांचा सर्व्हे करून उपचार व फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
काही दिवसांपासून सतत पाऊस, ऊन व ढगाळ वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, व्हायरल ताप, डेंग्यूसदृश साथीच्या आजाराच्या रुग्णांत वाढ होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी वाढत आहे. मुंडगाव येथील काही भागांमध्ये सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती जास्त असल्यामुळे ग्रामपंचायत विभागाने धूरफवारणी करण्याची मागणी होत आहे. आरोग्य विभागाने व ग्रामपंचायत विभागाने रुग्णांचा सर्व्हे करून उपचार करावा, अशी मागणी होत आहे.
-----------------
गावात साचले डबके
पावसाचे पाणी जागोजागी साचले असून, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरात घाण पसरली असून, गावात प्रत्येक घरात रुग्ण दिसून येत आहेत. पावसाळ्याला तीन महिन्यांचा कालावधी लोटून गेला तरीही संबंधित विभागाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभागाकडून गप्पी मासे व धूरफवारणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.