वैद्यकीय अधिका-यांचे सेवानवृत्तीचे वय वाढविले
By admin | Published: June 2, 2015 01:29 AM2015-06-02T01:29:00+5:302015-06-02T01:29:00+5:30
अधिका-यांची वानवा; राज्यातील ४१ अधिका-यांना फायदा.
राजेश शेगोकार /बुलडाणा: राज्य सरकारकडून चालविल्या जाणार्या अनेक जिल्हा व तालुका स्तरावरील रूग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होतो. त्यापृष्ठभूमिवर नवृत्त होणार्या अधिकार्यांचे सेवानवृत्ती वय वाढवून अधिकार्यांची कमी भरून काढण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. त्यानुसार ३१ मे रोजी नवृत्त होणार्या ४१ अधिकार्यांचे सेवानवृत्त वय वाढवून त्यांना पुन्हा सेवेत समावून घेण्याचा आदेश ३0 मे रोजी काढण्यात आला. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत सामान्य रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये चालविली जातात. यामधून गरजू रूग्णांना तत्काळ आरोग्य सुविधा पुरविली जाते; मात्र या रूग्णालयातच अधिकार्यांची कमतरता असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होताना दिसत आहे. ही बाब विचारात घेऊन आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत ३१ मे २0१५ रोजी वयाचे ५८ वर्ष पूर्ण केल्यामुळे नवृत्त होणार्या ज्या अधिकार्यांची वेतनङ्म्रेणी १५६00-३९१00 ग्रेड वेतन ५४00 व त्यावरील आहे अशा अधिकार्यांचे नवृत्ती वयोमान दोन वर्षांनी वाढविण्यात आले आहे. यासंदर्भात राज्याचे अवर सचिव वि.पु.घोडके यांच्या सहीने ३0 मे रोजी अध्यादेश काढण्यात आला असून हा निर्णय केवळ वैद्यकीय सेवेसाठीच लागू केला असल्याचे नमुद केले आहे.