बाळापूर-पातूर मार्गावर एसटी बसेस वाढवाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:19+5:302020-12-24T04:18:19+5:30
अवैध धंद्याचा सुळसुळाट बाळापूर : पोलीस स्टेशनच्या शहर व ग्रामीण भागात अवैध दारू, सट्टा, पत्त्यांचे ...
अवैध धंद्याचा सुळसुळाट
बाळापूर : पोलीस स्टेशनच्या शहर व ग्रामीण भागात अवैध दारू, सट्टा, पत्त्यांचे क्लब व अवैध गुरांची मांस विक्री सुरू असल्याने परिसरातील महिलांनी पोलीस स्टेशनवर येऊन अवैध दारू विक्रीवर निर्बंध घालण्याची मागणी पोलीस अधिकाऱ्यांनी धुळीस लावली आहे. उलट जोरात अवैध व्यवसाय बिनबोभाट सुरू आहे. वरिष्ठांनी याबाबत अवैध व्यवसायावर निर्बंध घालावे.
प्रशासकीय कार्यालयात पाणीविना शौचालय
बाळापूर : तालुका प्रशासकीय कार्यालयात ग्रामीण भागातून नागरिकांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी यावे लागते .प्रशासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची, तर स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कोंडी होत आहे. बाळापूर पंचायत समिती सभापती महिला असल्याने तेथेसुध्दा स्वच्छतागृह नाही.
तालुका क्रीडा संकुलाच्या जागेवर अवैध वीटभट्टी
बाळापूर : नियोजित तालुका क्रीडा संकुलाची आवारभिंत पूर्णत्वास येत असताना या जागेवर तहसीलदार यांनी वीटभट्टी लावण्यासाठी माती परवाना व जागेचे भाडे घेतल्याने क्रीडा संकुलाच्या जागेचे सपाटीकरण थांबले आहे. गेल्या १८ वर्षांपासून रेंगाळलेल्या कामात महसूल विभागाने खोडा घालून विकासकामांत अडथळा निर्माण केला आहे.