कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्या वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:23 AM2021-02-25T04:23:33+5:302021-02-25T04:23:33+5:30

अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी उपाययोजनांच्या कामांचा आढावा घेत, यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन कोरोनाबाधीत रुग्णांच्या ...

Increase tests by finding people in contact with coronary artery disease! | कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्या वाढवा!

कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्या वाढवा!

Next

अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी उपाययोजनांच्या कामांचा आढावा घेत, यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी बुधवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाडवे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन अंभोरे आदी उपस्थित होते.

महानगरपालिका व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्या वाढ, मृत्यू संख्या वाढ, होम आयसोलेशन सद्यस्थिती, औषधी व बेड स्थिती यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला. होम आयसोलेशमध्ये असलेल्या रुग्णांच्या निवासस्थानाच्या दर्शनी भागात पॉझिटिव्ह रुग्ण असल्याबातचे फलक लाऊन, आसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाकडे स्वतंत्र्य व्यवस्था आहे की नाही,याची खातरजमा करुन असे रुग्ण नियमाचे पालन करत नसल्याचे आढळल्यास त्याना संस्थागत विलगीकरण किवा फौजदारी कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.अतिसंवेदनशील भागात विशेष मोहिम राबवून आरटीपीसीआर व रॅपिड टेस्टचे प्रमाण वाढवून, ॲक्टीव्ह रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी संबंधित विभागांना दिल्या.

नमूने ठेवण्यासाठी

डिप फ्रिझरची खरेदी करा!

जिल्ह्यात ऑक्सीजन सिलेंडरचा पुरेसा साठा तसेच कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे नमूने ठेवण्यासाठी डिप फ्रिझरची खरेदी करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिल्या.

Web Title: Increase tests by finding people in contact with coronary artery disease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.