चोरीच्या घटनांमध्ये वाढ; दिग्रस गावाला युवकांचा पहारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:25+5:302021-06-26T04:14:25+5:30
गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने गावतील युवकांनी पुढाकार घेऊन जागरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये श्रीकांत ताले, गजानन काळे, ...
गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने गावतील युवकांनी पुढाकार घेऊन जागरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये श्रीकांत ताले, गजानन काळे, रामा गावंडे, पुरुषोत्तम सरप आदी ज्येष्ठ, युवकांचा समावेश आहे. चोरीच्या घटनामुळे ग्रामपंचायतकडून गावात दवंडी देऊन सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस प्रशासनाकडून सोशल मीडियाकडून माहितीपत्रक व्हायरल केले आहे. या परिपत्रकात चोरीच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले आहे. गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तीची माहिती व मोबाइलमध्ये फोटो काढून ठेवण्याचे आवाहन पत्रकात केले आहे.
----------------
पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने युवक गावात पहारा देत आहे. रात्रपाळीच्या ड्युटीमध्ये बदल करून वेळ लावण्यात आल्याचे माहिती आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण पसरल्याने पोलिसांनी परिसरात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
-----------------------
चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने गावागावात जनजगृती करणे सुरू आहे, तसेच पत्रकद्वारे ग्रामस्थांना सूचना देणे सुरू आहे. अनोळखी व्यक्तींबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
-राहुल वाघ, ठाणेदार, चान्नी पोलीस स्टेशन.
--------------------
गावात दवंडी देऊन सावध राहण्यासाठी जनजगृती करण्यात आली आहे. युवकांनीसुद्धा पुढाकार घेऊन रात्रीच्या सुमारास गावाच्या रक्षणासाठी वेळ दिली आहे.
-आशा सुधाकर कराळे, सरपंच, दिग्रस बु.
--------------------------