पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:19 AM2021-04-27T04:19:52+5:302021-04-27T04:19:52+5:30
.................................................................. ‘सीइओं’नी घेतली ‘बीइओं’ची बैठक अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया मे महिन्यात सुरू होणार आहे. त्यानुषंगाने ...
..................................................................
‘सीइओं’नी घेतली ‘बीइओं’ची बैठक
अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया मे महिन्यात सुरू होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी सोमवारी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांची (बीइओ) बैठक घेतली. बदलीस पात्र शिक्षक अन्य संबंधित मुद्यांची माहिती वेळेवर पाठविण्याचे काम काटेकोरपणे करण्याचे निर्देश ‘सीइओं’नी यावेळी दिले.
................................................
कोरोना उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी सायंकाळी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डाॅ.नीलेश अपार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
...........................................................
रस्त्यावर धुळीचे साम्राज्य कायम
अकोला: शहरातील आपातापा नाका ते दमाणी आय हाॅस्पिटलपर्यंत रस्त्याचे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे खोदून ठेवण्यात आलेल्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य कायम असून, या समस्येचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.
..............................................