काटेपुर्णा धरणाच्या जलसाठ्यात वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 10:47 AM2020-07-15T10:47:32+5:302020-07-15T10:48:08+5:30

महान: अकोला शहर, मूर्तिजापूर शहर, बोरगाव मंजूसह खांबोरा उन्नई बंधाऱ्यावरील ग्रामीण पाणी पुरवठ्यावरील ६४ खेडी गावांची तहान भागविणाºया महान ...

Increase in water storage of Katepurna Dam! | काटेपुर्णा धरणाच्या जलसाठ्यात वाढ!

काटेपुर्णा धरणाच्या जलसाठ्यात वाढ!

googlenewsNext

महान: अकोला शहर, मूर्तिजापूर शहर, बोरगाव मंजूसह खांबोरा उन्नई बंधाऱ्यावरील ग्रामीण पाणी पुरवठ्यावरील ६४ खेडी गावांची तहान भागविणाºया महान धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीलाच जलसाठा ५०.०७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
जून महिन्यात धरणात ३६ टक्के जलसाठा होता, त्यानंतर १२ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. धरणात ११२९.७० फूट, ३४४.३३ मीटर, ४३.२४० द.ल.घ.मी. व ५०.०७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून, १ जून ते १३ जुलैपर्यंत एकूण २५५ मि.मी. पावसाची नोंद महान पाटबंधारे विभागाने केली आहे. गतवर्षी १३ जुलै २०१९ रोजी धरणात ११०९.८७ फूट, ३३८.२९ मीटर, ३.४९८ द.ल.घ.मी. असा केवळ ४.०५ टक्के एवढाच जलसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा काटेपुर्णा धरणात तब्बल ४६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यंदा काटेपूर्ण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत असलेल्या १२ लघूतलाव सुकंडा, कुरळ, कोल्ही, रिझोरा, मसला, खडकी, मालेगाव, बोरगाव, कुत्तरडोह, डव्हा, सुधी व चाका तीर्थ असे एकूण १२ लघू तलाव तुडूंब भरली आहेत.


विश्रामगृहाकडील टेकडी पाण्याखाली!
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महान धरणाच्या पाणी पातळीत चांगल्याच प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील वाघा, कोथळी, जांभरूण, देवधरीकडील टेकड्या पाण्यामध्ये बुडाल्या असून, विश्रामगृहाकडील टेकडी पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे.

Web Title: Increase in water storage of Katepurna Dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.