पश्चिम विदर्भातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:51+5:302021-07-18T04:14:51+5:30
मोठ्या प्रकल्पांमध्ये पाच टक्के साठा वाढला! पश्चिम विदर्भातील मोठ्या ९ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. अरुणावती, पेनटाकळी, बेंबळा धरण ...
मोठ्या प्रकल्पांमध्ये पाच टक्के साठा वाढला!
पश्चिम विदर्भातील मोठ्या ९ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. अरुणावती, पेनटाकळी, बेंबळा धरण क्षेत्र भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या सर्व ९ प्रकल्पांमध्ये ११ दिवसांमध्ये ५ टक्के जलसाठा वाढला आहे.
कोराडी, पूर्णा व बेंबळा प्रकल्पातून विसर्ग
गत १० दिवसांमध्ये चांगला पाऊस झाल्याने अमरावती विभागातील कोराडी (जि. बुलडाणा), पूर्णा (जि. अमरावती), बेंबळा (जि. यवतमाळ) या तीन प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा निर्माण झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोराडी प्रकल्प १०० टक्के
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील बहुतांश भागात तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला; मात्र, गत ११ दिवसांआधीच बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कोराडी हा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला. तर यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा प्रकल्पाचा साठा ७४.१० टक्क्यांवर पोहोचला आहे.
या धरणक्षेत्रात अपेक्षित पाऊस नाही!
धरण जलसाठा (दलघमी)
नळगंगा २८.५९
काटेपूर्णा ३८.०९
वान ३२.४७