हाॅटेलांमध्ये वाढली गर्दी; प्रचार अंतिम टप्प्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:51+5:302021-01-14T04:15:51+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीत आगर येथील ३६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनी आपापली ताकत पणाला लावून विजयाचा मानकरी होण्यासाठी तयारी सुरू केली ...
ग्रामपंचायत निवडणुकीत आगर येथील ३६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनी आपापली ताकत पणाला लावून विजयाचा मानकरी होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मतदानाची तारीख जवळ आल्याने हाॅटेल आणि ढाबे या ठिकाणी ग्रामस्थांची संख्या वाढली आहे. ढाबे हाऊसफुल झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. संपूर्ण उमेदवारांचे दोन्ही पार्टीचे - पार्टीचालक आपल्या मतांची जुळवा-जुळव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहेत.
------------------
धाब्यावर गर्दी; नियमांचे उल्लंघन
आगर गावापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उगवा फाटा येथे तीन ते चार धाबे असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाब्यावर गर्दी वाढली आहे. उमेदवारांसह इतरांची दररोज गर्दी वाढत आहे. मात्र, यावेळी कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
-----------------------------
अवैध दारूविक्री वाढली!
निवडणुकीच्या कार्यकाळात गावात मोठ्या प्रमाणात मद्यविक्री होत आहे. याकडे राज्य उत्पादन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.