शाळकरी मुलांमध्ये वाढल्या डोळ्याच्या तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:19 AM2021-04-08T04:19:28+5:302021-04-08T04:19:28+5:30

नजर कमी होण्याचा धोका स्क्रीनवरील रेडिएशनमुळे डोळ्यात पाणी येणे, डोळे खुपणे, लाली येणे, डोळे दुखणे, डोळ्यांवर ताण येणे अशा ...

Increased eye complaints in school children! | शाळकरी मुलांमध्ये वाढल्या डोळ्याच्या तक्रारी!

शाळकरी मुलांमध्ये वाढल्या डोळ्याच्या तक्रारी!

Next

नजर कमी होण्याचा धोका

स्क्रीनवरील रेडिएशनमुळे डोळ्यात पाणी येणे, डोळे खुपणे, लाली येणे, डोळे दुखणे, डोळ्यांवर ताण येणे अशा प्रकारचा त्रास होतो. तासन‌्तास स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो. त्यामुळे काही दिवस अशा लक्षणांचा त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, अन्यथा नेत्रपटलास इजा होऊन नजर कमी होण्याचा धोकाही असतो, असे डाॅक्टरांकडून सांगण्यात येते.

हे करा

ॲन्टी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग ग्लासचा चष्मा वापरावा.

संगणकाला प्रोटेक्टिव्ह स्क्रीन लावूनही दुष्परिणाम टाळता येतील.

कोरडेपणाचा त्रास असल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्याने, कृत्रिम अश्रूंचा ड्राॅप घ्यावा.

या रुग्णांमध्ये वाढ

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचा कोरडेपणा, डोळे खाजवणे, लाल होणे, डोके दुखणे, दृष्टी कमी होणे अशा लक्षणांचे रुग्ण वाढत आहेत. मोबाईल किंवा इतर स्क्रीनपासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी ॲन्टी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग ग्लासचा चष्मा वापरावा. भरपूर पाणी प्यावे व पोषक आहार घ्यावा, असा सल्ला नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश पवार यांनी दिला.

Web Title: Increased eye complaints in school children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.