साेशल मीडियावर वाढली गुंडागर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:24 AM2021-08-25T04:24:19+5:302021-08-25T04:24:19+5:30
अकाेला : तरुणांमध्ये वाढदिवस साजरे करण्याचे एक वेगळेच फॅड सध्या सुरू असून, तलवारीने केक कापणे, त्याचे फाेटाे व व्हिडिओ ...
अकाेला : तरुणांमध्ये वाढदिवस साजरे करण्याचे एक वेगळेच फॅड सध्या सुरू असून, तलवारीने केक कापणे, त्याचे फाेटाे व व्हिडिओ साेशल मीडियावर टाकणे व पाेलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्यांच्यावरही अरेरावी करणाऱ्या अशा गुंड प्रवृत्तींच्या युवकांची साेशल मीडियावर गुंडागर्दी वाढल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर सायबर व अकाेला पाेलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्या मुसक्याही आवळल्या आहेत, तर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तलवारीने केक कापल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकही केली आहे. त्यामुळे सध्यातरी ही गुंडागर्दी अकाेला पाेलिसांनी माेडीत काढली असल्याचे वास्तव आहे़
साेशल मीडियावर वाॅच ठेवण्याचे काम सायबर पाेलिसांकडून करण्यात येत आहे. कुणीही वाढदिवस साजरा करताना तलवार, गुप्ती, चाकू किंवा तशा प्रकारचे धारदार शस्त्र वापरल्यास तातडीने कारवाइ करण्यात येत आहे. अशा कारवाया पाेलिसांनी पुढाकार घेऊन केल्या असून, अशा गुंडांचा बंदाेबस्त कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़
-जी. श्रीधर, पाेलीस अधीक्षक, अकाेला
तलवारीने केक कापण्याची फॅशन
तलवारीने केक कापण्याची फॅशन प्रचंड रूढ झाली आहे. युवकांच्या टाेळ्यांकडून तलवारीने केक कापण्याची फॅशन ज्या प्रकारे वाढली त्याच प्रमाणात पाेलीस कारवायाही वाढल्या आहेत. पाेलिसांनी कारवाई करताच ती तलवार लाकडी तसेच प्लास्टिकची असल्याचा खुलासा करण्यात येतो. यावरून अकाेला पाेलीस अशा साेशल मीडियावरील गुंडांवर कारवाईसाठी तत्पर असल्याची माहिती आहे.
कट्टा तलवार अन् चाकू
तलवारीने केक कापताना देशी कट्टा वापरणे, चाकू व तलवार वापरतानाचे फाेटाे, तसेच व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरत करतात. मात्र, अकाेला पाेलिसांनी कारवाईसाठी पुढाकार घेतल्यानंतर अशा गुंडांचा कायमस्वरूपी बंदाेबस्त करण्यात आला आहे. यावरून तलवार व धारदार शस्त्रांनी केक कापणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पाेलिसांना यश आले आहे.
लाइक करणारेही येणार अडचणीत
तलवारीने केक कापणाऱ्यांचा व्हिडिओ, तसेच फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्यांना लाइक करणारे व कमेंट करणारेही अडचणीत येणार आहेत. त्यामुळे अशा गुंडांपासून दूरच राहिलेले बरे, अशी वेळ सध्या आली आहे. साेशल मीडियावरील फाेटाे व व्हिडिओ लाइक केल्यास किंवा कमेंट केल्यास त्यांच्यावर फाैजदारी कारवाई करण्याचा अधिकार पाेलिसांना आहे़
पाेलीस अधिकारीही आले हाेते अडचणीत
तलवारीने केक कापल्याचा प्रकार सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांपूर्वी घडला हाेता. एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा केक कापताना चक्क ठाणेदारच वर्दीत तलवारीने केक कापतानाचे फाेटाे व्हायरल झाले हाेते, तर त्यावेळी कारणे दाखवा नाेटीसही बजावण्यात आली हाेती. त्यानंतर आता एका पक्षाच्या नेत्याचा वाढदिवस साजरा करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने एका पाेलीस कर्मचाऱ्यालाही चांगलेच महागात पडले़
दाखल गुन्हे
२०१९ २१
२०२० १४
२०२१ ०९