सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:20 AM2021-02-16T04:20:18+5:302021-02-16T04:20:18+5:30

कापड बाजारात वाढली गर्दी अकोला: सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने कापड बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली दिसून येत आहे. कापड ...

Increased in patients with cold, cough | सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

Next

कापड बाजारात वाढली गर्दी

अकोला: सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने कापड बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली दिसून येत आहे. कापड दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. हा प्रकार नियंत्रणात आणण्याची गरज आहे.

काेरोनामुळे रक्तसंकलन प्रभावीत

अकोला: मध्यंतरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्तसंकलनाचे प्रमाण वाढू लागले होते. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रक्तदान शिबिरेही घेण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होवू लागल्याने त्याचा परिणाम रक्त संकलनावर होताना दिसून येत आहे.

भाजी बाजारात अस्वच्छता

अकोला: जनता भाजी बाजार हा शहरातील मुख्य भाजी बाजार असून, या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची उलाढाल होते. यातील सडका भाजीपाला विक्रेत्यांकडून बाजार परिसरातच टाकून दिला जातो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

ऑटो, बसमध्ये विनामास्क प्रवास

अकोला: जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असतानाही अनेक जण बेफिकरीने संचार करताना दिसून येत आहेत. प्रामुख्याने ऑटो आणि एसटी बसमध्ये बहुतांश प्रवासी विनामास्क प्रवास करताना दिसून येत आहेत. हा प्रकार कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

Web Title: Increased in patients with cold, cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.