पीपीई किटमुळे वाढल्या डॉक्टरांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 09:05 AM2020-09-28T09:05:33+5:302020-09-28T09:05:39+5:30

लॅमिनेटेड किट ठरतेय त्रासदायक

Increased physician problems due to PPE kits | पीपीई किटमुळे वाढल्या डॉक्टरांच्या समस्या

पीपीई किटमुळे वाढल्या डॉक्टरांच्या समस्या

Next


अकोला : कोरोना विरुद्धच्या लढ्यात ‘फंटलाइन वॉरियर’ म्हणून कार्यरत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफला आता संरक्षणात्मक किटमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सहा तासांपेक्षा अधिक पीपीई किट घालणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ डोके दुखी, चक्कर आणि वाढत्या रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत असल्याचे समोर येत आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे वॉर्ड फुल्ल झाले असून, अतिदक्षता विभागात खाट मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत खऱ्या अर्थाने डॉक्टर लढवय्यांसारखे काम करीत आहेत. कोरोनाबाधितांचे वॉर्ड डॉक्टरांसाठी हॉटस्पॉट झाले आहे. संसर्ग टाळण्यासाठी पीपीई किटचा वापर के ला जातो. सर्वोपचार रुग्णालयात लॅमिनेटेड व नॉन लॅमिनेटेड अशा दोन्ही प्रकारच्या किट उपलब्ध आहेत; मात्र महागडी किट व मागणीच्या तुलनेत पुरवठा अल्प होत असल्याने डॉक्टरांना साधारण सहा ते आठ तास ते घालून राहावे लागते. एकदा किट घातल्यास खाणेपिणे करता येत नाही. वॉशरूममध्ये जाणेदेखील टाळले जाते. काही डॉक्टर्स यासाठी ‘अ‍ॅडल्ट डायपर्स’चाही वापर करतात. ड्युटीची वेळ संपल्यावर व पीपीई किट काढून कचरापेटीमध्ये टाकल्यावरच ते सामान्य जीवनात परत येतात. लॅमिनेटेड म्हणजे प्लास्टिक कोट असलेल्या किटमुळे निवासी डॉक्टर व इन्टर्नला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

दोन तासातच कपडे होतात ओले
एका डॉक्टरने सांगितले, लॅमिनेटेड किट घालून रुग्णसेवा देणे कठीण झाले आहे. ही किट घातल्यानंतर शरीराला हवा मिळत नाही. घाम इतका येतो की तास दोन तासातच संपूर्ण कपडे ओले होतात. डोळ्यात घाम येणे, जळजळ होण्यास कारणीभूत ठरते. सतत ग्लोब घातल्यामुळे त्वचेची समस्या निर्माण होते. पीपीई किट घालण्यापूर्वी डोके कव्हर घातले जाते, ज्यामुळे डोकेदुखी होते. तर, सतत मास्क घातल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे हृदयाचा ठोका वाढतो. परिणामी, डॉक्टर चक्कर येऊन पडण्याचा घटना वाढल्या आहेत.

Web Title: Increased physician problems due to PPE kits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.