‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाढले नेत्र विकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 10:36 AM2020-12-02T10:36:47+5:302020-12-02T10:41:01+5:30
Akola News विद्यार्थ्यांमध्ये नेत्र विकाराच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
अकोला: कोरोनाच्या काळात शाळा बंद आणि खासगी नोकरदारांचे घरून काम सुरू असल्याने या दोन्ही घटकांचा स्क्रीन टाइम वाढला. मोबाइल आणि लॅपटाॅपच्या अतिवापराने विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये नेत्र विकाराच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या सात महिन्यांपासून शाळा बंद असल्याने ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. परिणामी मोबाइल, लॅपटाॅप आणि टीव्हीचा वापर अधिक वाढल्याने डोळ्यांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. ऑनलाइनमुळे काम सोपे झाले असले तरी टाळेबंदीच्या काळात स्क्रीनसमोरील लोकांचा वेळ वाढल्याने तक्रारी वाढल्या आहेत. विशेष करून शाळकरी मुलांमध्ये डोळ्याच्या तक्रारी अधिक आहेत. शिक्षण आणि कार्यालयीन कामकाजासह मनोरंजनासाठीही मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, आयपॅड यासारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढला आहे. मुले मोबाइल गेम्स आणि युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सोशल मीडियाचा वापर वाढल्याने नेत्राच्या आरोग्याशी संबंधित तक्रारी पुढे येत आहेत. नजर कमी होण्याचा धोका स्क्रीनवरील रेडिएशन डोळ्यात पाणी येणे, डोळे खुपणे, लाली येणे, डोळे दुखणे, डोळ्यांवर ताण येणे अशा प्रकारचा त्रास होतो. तासनतास स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो. त्यामुळे काही दिवस अशा लक्षणांचा त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, अन्यथा नेत्रपटलास इजा होऊन नजर कमी होण्याचा धोकाही असतो. असे डाॅक्टरांकडून सांगण्यात येते. हे करा ॲन्टी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग ग्लासचा चष्मा वापरावा संगणकाला प्रोटेक्टिव्ह स्क्रीन लावूनही दुष्परिणाम टाळता येतील कोरडेपणाचा त्रास असल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्याने, कृत्रिम अश्रूचा ड्राॅप घ्यावा रुग्णांमध्ये वाढ मोबाइलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचा कोरडेपणा, डोळे खाजवणे, लाल होणे, डोके दुखणे, दृष्टी कमी होणे अशा लक्षणांचे रुग्ण येत आहेत. मोबाइल किंवा इतर स्क्रीनपासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी ॲन्टी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग ग्लासचा चष्मा वापरा.