"राजकीय नेत्यावरील वाढते हल्ले, गृहमंत्रालयाचे अपयश, गृहमंत्र्यानी वर्क लाेड कमी करावा", सुषमा अंधारेंचा खोचक टोला  

By राजेश शेगोकार | Published: March 3, 2023 01:54 PM2023-03-03T13:54:01+5:302023-03-03T13:55:04+5:30

Sandeep Deshpande attack case: राजकीय नेत्यांवरील वाढते हल्ले हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असा आराेप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील वर्क लाेड कमी करून इतरांना संधी द्यावी असा टाेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. 

"Increasing attacks on political leaders, failure of home ministry, home minister should reduce work load", says Sushma Andhare | "राजकीय नेत्यावरील वाढते हल्ले, गृहमंत्रालयाचे अपयश, गृहमंत्र्यानी वर्क लाेड कमी करावा", सुषमा अंधारेंचा खोचक टोला  

"राजकीय नेत्यावरील वाढते हल्ले, गृहमंत्रालयाचे अपयश, गृहमंत्र्यानी वर्क लाेड कमी करावा", सुषमा अंधारेंचा खोचक टोला  

googlenewsNext

- राजेश शेगाेकार
अकाेला : अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांवरील हल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याच शृखंलेत आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला येताे. या हल्लाचा आम्ही निषेध करत असून राजकीय नेत्यांवरील वाढते हल्ले हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असा आराेप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील वर्क लाेड कमी करून इतरांना संधी द्यावी असा टाेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. 

शिवगर्जना अभियानासाठी त्या अकाेल्यात आल्या असता शुक्रवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला, अकाेल्यात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या घरी झालेला हल्ला, ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखाची हत्या अशा घटना वाढत्याच आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी वर्कलाेड कमी करावा, सहा जिल्हयाचे पालकमंत्री पद व माेठी खाती सांभाळतांना त्यांची कसरत  हाेत आहे त्यामुळे या पदाला न्याय देण्यासाठी त्यांनी इतरांना संधी द्यावी, गृहमंत्री म्हणून त्यांनी या हल्याची जबाबादारी घेतली पाहीजे असा टाेलाही लगावला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, डाॅ.विजय दुताेंडे,  अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, राहूल कराळे आदी उपस्थित हाेते.

Web Title: "Increasing attacks on political leaders, failure of home ministry, home minister should reduce work load", says Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.