स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढतीच
By admin | Published: March 12, 2015 01:43 AM2015-03-12T01:43:19+5:302015-03-12T01:43:19+5:30
अवकाळी पाऊस व वातावरणातील गारव्याने रुग्णांमध्ये वाढ
अकोला : स्वाइन फ्लू या गंभीर आजाराने अकोल्यात उपचार घेत असलेल्या चार जणांचा बळी घेतल्यानंतर मंगळवारी दोन महिलांचा अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारपासून वातावरणात बदल झाला असून, अवकाळी पाऊस व हवेतील गारव्याने स्वाइन फ्लूसाठी पोषक वातावरण झाले असून, रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याचा धोका तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गत तीन दिवसांपासून उपचार घेत असलेल्या केशवनगर येथील सोनाली केशव इंगोले व आकोट फैल येथील रहिवासी हिना परविन यांचा तपासणी अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच सोनाली इंगोले यांचे पती अँड. केशव इंगोले यांनाही स्वाइन फ्लू संशयित म्हणून दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या नरेश पुंडलिक फुंड (३२), रा. मानोरा रोड, कारंजा लाड, सोपान वासुदेव उगले (५४), रा. मलकापूर रोड, नांदुरा, रावसाहेब साहेबराव देशमुख (३५), रा. मानोरा, वाशिम, किरण महेश अग्रवाल (५५), रा. शिवाजीनगर, भुसावळ, अथर्व मंगेश पांडे (3), रा. वरखेड, बाश्रीटाकळी यांचाही स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात आणखी ५ संशयित रुग्णांवर उपचार सुरू असून, शहरातील खासगी रुग्णालयामध्ये २ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत