विद्यार्थिनींसोबत अश्लील संवाद; गैरसमजातून शिक्षकाला चोपले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:12 PM2020-02-18T12:12:09+5:302020-02-18T12:12:17+5:30

चौकशीअंती असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले.

Indecent interaction with students; Misunderstood teacher beaten | विद्यार्थिनींसोबत अश्लील संवाद; गैरसमजातून शिक्षकाला चोपले!

विद्यार्थिनींसोबत अश्लील संवाद; गैरसमजातून शिक्षकाला चोपले!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गत काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील संवाद साधल्याच्या गैरसमजातून शिक्षकाला पालकांनी सोमवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास चांगलाच चोप दिला. ही घटना शहरालगतच्या अकोली खुर्द गावातील एका शाळेत घडली. या प्रकरणात पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले होते; परंतु चौकशीअंती असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले.
अकोली खुर्द गावातील एका प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत अश्लील संवाद साधल्याच्या गैरसमजातून काही पालक जाब विचारण्यासाठी सोमवारी दुपारी शाळेत आले आणि त्या शिक्षकाची कॉलर पकडून त्याला जाब विचारला आणि चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती जुने शहर पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून संबंधित शिक्षकाची पालकांच्या गराड्यातून सुटका केली आणि त्याला ताब्यात घेतले. शिक्षकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. संबंधित विद्यार्थिनी व पालकांना पोलीस उपनिरीक्षक संगीता रंधे यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्या शिक्षकाने आमच्यासोबत कोणताही अश्लील संवाद साधला नाही. चांगल्या हेतूनेच, बाहेर वाईट घटना घडत आहेत, असे शिक्षकाने सांगितल्याचे त्या विद्यार्थिनी म्हणाल्या. त्यामुळे पोलिसांनी त्या शिक्षकाला सोडून दिले. दरम्यान हा प्रकार सोशल माध्यमांमध्येही व्हायरल झाल्याने दिवसभर ही शाळा चर्चेत होती.

त्या मुली व पालकांशी सवांद साधत महिला पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. चौकशीत मुलींनी ते शिक्षक आम्हाला काही बोलले नसल्याचे सांगितले. जे ही सांगीतले ते चांगल्या हेतूनेच सांगितले. शाळेत जो प्रकार घडला, तो गैरसमजातून घडला. तसा जबाब पालकांनी लिहून दिला आहे. त्यामुळे आम्ही त्या शिक्षकाची सुटका केली.
-प्रकाश पवार,
ठाणेदार , जुने शहर पोलीस स्टेशन

 

Web Title: Indecent interaction with students; Misunderstood teacher beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.