११ जूनला मिळणार देशी बीटी कपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:49 PM2019-06-09T13:49:45+5:302019-06-09T13:50:09+5:30
अकोला : बहुप्रतीक्षित देशी बीजी-२ कपाशीचे यावर्षी ४३,५०० पाकिटे तयार असून, ११ जूननंतर शेतकऱ्यांना बाजारात उपलब्ध केले जाणार आहे.
अकोला : बहुप्रतीक्षित देशी बीजी-२ कपाशीचे यावर्षी ४३,५०० पाकिटे तयार असून, ११ जूननंतर शेतकऱ्यांना बाजारात उपलब्ध केले जाणार आहे.
महतप्रयासानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पीकेव्ही-२ व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नांदेड-४४ या हायब्रीड कपाशीमध्ये (बीटी) बीजी-२ जीन्स टाक ण्यात यश आले आहे. महाराष्टÑ राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाने ही दोन्ही बीजी-२ वाण विकसित केले. या वाणाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असल्याने विक्रेत्यांनीही जवळपास ९० हजारांवर पाकिटांची नोंदणी महाबीजकडे केली आहे. तथापि, यावर्षी केवळ ४३ हजार ५०० पाकिटे महाबीजकडे उपलब्ध असून, यात अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ पाच जिल्ह्यांसाठी १३,५०० पाकिटे दिली जाणार आहेत. पीकेव्ही-२ विदर्भासाठी असून, नांदेड-४४ हे बीजी-२ वाण मराठवाडा विभागासाठी आहे.
विदर्भात सर्वाधिक कपाशीची पेरणी अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात केली जाते. अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती जिल्ह्यातही कपाशी पेरणी मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. त्यामुळे येथील शेतकºयांना देशी बीजी-२ कपाशी वाणाची प्रतीक्षा आहे.
- पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी १३,५०० बीजी-२ कपाशी वाणाची पाकिटे तयार आहेत. ११ जून रोजी शेतकºयांना बाजारात उपलब्ध केले जाणार आहेत.
बी. डी. लुले,
विभागीय व्यवस्थापक, महाबीज, अकोला.