कृषी विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:29+5:302021-08-18T04:24:29+5:30
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने गुणगौरव सोहळा अकोला : स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात ...
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने गुणगौरव सोहळा
अकोला : स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डाॅ. अनिल भिकाने, मंत्रालय कक्ष अधिकारी नंदकुमार राऊत यांच्यासह प्रा. डाॅ. चैतन्य पावशे, प्रा. डाॅ. मिलिंद थोरात व सहायक कुलसचिव मारोती गावडे हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. किशोर पजई, डाॅ. महेश इंगवले, डाॅ. मंगेश वडे, डाॅ. कुलदीप देशपांडे, डाॅ. श्याम देशमुख यांना उत्कृष्ट अधिकारी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांत डॉ. आनंद रत्नपारखी, रामेश्वर लोथे, अशोक कुळवंत, संदीप वैलकर, मिलिंद देशमुख, भास्कर नागे, सूर्यकांत राखोंडे, प्रभाबाई खोब्रागडे व मनोज निनोरिया यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रा. डाॅ. शैलेंद्र कुरळकर, डाॅ. रणजीत इंगोले, डॉ. प्राजक्ता कुरळकर व डाॅ. गिरीश पंचभाई यांच्यासह प्रा. डाॅ. सतीश मनवर यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन डाॅ. प्रवीण बनकर यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ. गिरीश पंचभाई यांनी केले. यशस्वितेसाठी पी.डी. पाटील, उज्ज्वल बढे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.