संत गजानन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:25 AM2021-08-17T04:25:25+5:302021-08-17T04:25:25+5:30
----------------------- माळेगाव बाजार येथे स्वातंत्र्यदिन साजरा माळेगाव बाजार: येथे ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सैनिक विठ्ठल ...
-----------------------
माळेगाव बाजार येथे स्वातंत्र्यदिन साजरा
माळेगाव बाजार: येथे ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सैनिक विठ्ठल मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच संजय बगाडे, उपसरपंच अकलिम खा साहेब खा, ग्रामपंचायत सदस्य शे आरिफ शेख अब्दुल्ला, प्रमोद वानेरे, सुनीता बगाडे, आशा इंगळे, स्वाती अढाऊ, गवईष महादेव घोगले, आशा सेविका, आरोग्य सेविका, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन जि.प. शाळेचे मुख्याध्यापक खोडे यांनी केले, तर उपकेंद्रातील कार्यक्रमात ध्वजारोहण डॉ. बिमकर यांनी केले, तर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक खोडे यांनी केले.
----------------
उमई जि.प. शाळेत स्वातंत्र्यदिन
उमई: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य देवानंद जामनिक यांनी राष्ट्रध्वजाचे पूजन करून झेंडावंदन शाळेचे मुख्याध्यापक आगळे यांनी केले. कार्यक्रमाला सहायक शिक्षक जोशी, अंगणवाडी सेविका व गावातील ग्रामस्थ शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी व्यसनमुक्त राहण्यासाठी तंबाखू, सिगारेट, बिडी सुटकेपासून शपथ देण्यात आली.
--------------------
मुंडगाव लोहारी येथे स्वातंत्र्य दिवस साजरा
मुंडगाव: मुंडगाव, लोहारी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच श्रावण भरक्षे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जि.प. शाळेमध्ये मुख्याध्यापक यांच्या हस्ते तर प्रा.आ. केंद्र येथे जि.प. सदस्या यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुंडगाव येथील ग्राम पंचायतीमध्ये सरपंच श्रावण भरक्षे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष जि. प. सदस्या सुश्मिता सरकटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जि. प. कन्या शाळेमध्ये मुख्याध्यापक सीमा केवटी, जि.प. उर्दू शाळेमध्ये मुख्याध्यापक शे. अमीर. शे. चांद, व जि.प. मुलांची शाळा येथे शाळेचे मुख्याध्यापक वंदना गारोडी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक उपस्थितीत होते. लोहारी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच प्रदीप सपकाळ. जि. प. प्रा. मराठी शाळा येथे मुख्याध्यापक गोंडचोर यांनी ध्वजारोहण केले. या कार्यक्रमाच्या वेळी व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
-------------------
जवाहर कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा
जामठी बु.: स्थानिक जवाहर विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, प्रायमरी इंग्लिश स्कूल, व काॅन्व्हेंटमध्ये जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमात अंजली धनोकार यांनी सुविचार कथन केला. प्राचार्य प्रमोद महल्ले यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास जवाहर कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष कुंदनकुमार देशमुख, माजी प्राचार्य पी.एन. बोळे, माजी प्राचार्य आर. डी. बोळे, माजी शिक्षक आर. एस. कळंब, विठ्ठल मिसळकर, मोहन तायडे व सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वांनी तंबाखूमुक्त शपथ घेतली व वृक्षारोपण करण्यात आले. संचालन प्राध्यापक अरविंदकुमार मनोहर तर आभारप्रदर्शन पर्यवेक्षिका
विमल काटकर यांनी केले.