स्वातंत्र्यदिनी ‘फ्रीडम’ने केला कोविड योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:25 AM2021-08-18T04:25:01+5:302021-08-18T04:25:01+5:30
------------------------ सामाजिक कार्यकर्ते विजय जितकर सन्मानित अकोट: स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विजय जितकर यांच्या कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन उपविभागीय अधिकारी यांच्या ...
------------------------
सामाजिक कार्यकर्ते विजय जितकर सन्मानित
अकोट: स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विजय जितकर यांच्या कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्थानिक तहसील कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनी पार पडलेल्या कार्यक्रमात जितकर यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त शिक्षक विजय जितकर यांनी बीएलओ म्हणून विविध उपक्रम राबविले. तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा बीएलओ म्हणून उत्कृष्ट कार्य करीत आहे. सहकार्य व सेवेबद्दल उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, प्रभारी तहसीलदार हरीश गुरव यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. यावेळी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, गटविकास अधिकारी शिंदे, न.पा. मुख्याधिकारी वाहुरवाघ, शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
-----------------------------
सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये कार्यक्रम
अकोटः स्थानिक सेंट पॉल्स अकॅडमी व पब्लिक स्कूलमध्ये ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रमोद चांडक, प्रमुख अतिथी संस्थेच्या संचालक रेखा चांडक, सुधा डागा, मुख्याध्यापक विजय बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, जयश्री बिहाडे, पर्यवेक्षक अमर ठाकूर, रिंकू अग्रवाल यांची उपस्थिती होती. संस्थेचे सचिव प्रमोद चांडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन भाषणे व गीत गायनाचे, तसेच समूह गायनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता नियमांचे पालन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन आमेना परवीन, आभार जयश्री हिंगणकर यांनी मानले. संस्थेचे सचिव प्रमोद चांडक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख वनिता थोरात, प्रभुदास नाथे, कविता मिश्रा, नितीन गावंडे, रुपाली पडोळे, सुषमा कराळे, नयना रघुवंशी, रजनी भवाने, रश्मी अग्रवाल, संगीता मर्दाने, प्रशांत ठोळक, आकाश धुमाळे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
-------------------
शिवाजी विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा
अकोटः स्थानिक श्री शिवाजी विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अतुल म्हैसने, तर प्रमुख उपस्थिती यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास गावंडे, पर्यवेक्षक राजेश सावरकर, अंजली गावंडे, शिक्षक प्रतिनिधी प्रा. माया कोरपे यांची होती. मुख्याध्यापक अतुल म्हैसने यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडले. कार्यक्रमाचे संचालन प्रतीक जगताप, पंकज गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश देशमुख, सुभाष चौधरी, दशरथ हिंगणकर, विलास हिंगणकर, सुनील येवतकार, वालवंशी, शिवणकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी मुख्याध्यापक अतुल म्हैसने व ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
--------------
लालबहादूर शास्त्री ज्ञानपीठ मध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा
अकोटः लालबहादूर शास्त्री ज्ञानपीठ व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला. याप्रसंगी संस्था अध्यक्ष सुरेश खोटरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. याप्रसंगी सचिव भरत पेठे, कोषाध्यक्ष कुंजीलाल कोठारी, प्राचार्य श्यामकुमार शर्मा यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन काळे, प्राचार्य श्यामकुमार शर्मा यांनी केले. कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक धीरज कळसाईत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक गणेश करूले यांनी मानले.