विकासाच्या दृष्टीने स्वतंत्र विदर्भ राज्य गरजेचे - अँड. श्रीहरी अणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:56 AM2017-12-15T01:56:37+5:302017-12-15T01:58:58+5:30
अकोला : वेगळय़ा विदर्भाची मागणी ही अलीकडची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. निवडणुका आल्या, की वेगळय़ा विदर्भाची मागणी पुढे येते. नंतर मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते; परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय येथील विकासाला गती मिळू शकत नाही, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड. श्रीहरी अणे यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेवटर्क

अकोला बार असोसिएशनच्या कार्यालयाला त्यांनी गुरुवारी दुपारी सदिच्छा भेट दिली. यावेळी बार असोसिएशनतर्फे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विचारपीठावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.झेड. ख्वाजा, ज्येष्ठ विधिज्ञ अँड. बी.के. गांधी, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष अँड. गजानन खाडे, जिल्हा सरकारी वकील अँड. राजेश्वर देशपांडे आदी होते. यावेळी अँड. जोशी यांनी श्रीहरी अणे यांचे स्वागत केले. अँड. अणे यांनी, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड यांची निर्मिती मोठय़ा राज्यांमधूनच झाली. मोठय़ा राज्यांमध्ये समाविष्ट असल्यामुळे हे छोटे भाग विकासापासून वंचित होते; परंतु या सर्व लहान राज्याची निर्मिती झाल्यानंतर, त्यांचा झपाट्याने विकास झाला. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा झाल्याशिवाय आमची प्रगती होणार नाही. विदर्भावर सातत्याने अन्याय होत आला, असे अँड. श्रीहरी अणे म्हणाले. विदर्भ राज्यात मोठी खनिज संपत्ती, नैसर्गिक संपत्ती आहे; परंतु त्याचा वाटाही महाराष्ट्र विदर्भाला देत नाही. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष वेगळय़ा विदर्भाची भूमिका मांडतात आणि निवडणुका संपल्या की वेगळय़ा विदर्भाचा मुद्दा विसरतात. विदर्भाचा विकास साधायचा असेल, तर वेगळय़ा राज्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनच आपण वेगळय़ा विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनजागृती करण्यासाठी दौरा करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन बार असोसिएशनचे वरिष्ठ सचिव अँड. अनुप देशमुख यांनी केले. आभार सचिव मो. इलियास शेखानी यांनी मानले.