भारतीय राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातच कायम ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 03:23 PM2019-08-13T15:23:44+5:302019-08-13T16:05:33+5:30
ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री डॉक्टर रणजीत पाटील सर बटालियन कॅम्प बचाव कृती समितीला दिले.
-विजय शिंदे
अकोटः भारत राखीव बटालियन कॅम्प अकोट मतदारसंघातील तेल्हारा तालुक्यात तळेगाव वडनेर व मनात्री येथे कायम ठेवण्यात येणार असल्याचे ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री डॉक्टर रणजीत पाटील बटालियन कॅम्प बचाव कृती समितीला दिले. बटालियन कॅम्प हा तेल्हारा तालुक्यातच कायम राहावा या मागणी वर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह बटालियन बचाव कृती समितीचे शिष्टमंडळ १३ ऑगस्ट रोज मुंबईला दाखल झाले. मुंबई पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बटालियन बचाव कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिली. यावेळी झालेल्या बैठकीत डॉक्टर पाटील यांनी बटालियन कॅम्प बचाव समितीच्या निवेदनासोबत तेल्हारा तालुक्यातून हा कॅम्प स्थलांतरित केल्याने जनतेमध्ये असलेला असंतोष मुख्यमंत्र्यां समोर मांडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या त्यानंतर डॉ. रणजीत पाटील यांच्याशी कृती समितीच्या समक्ष चर्चा करून भारतीय राजीव बटालियन कॅम्प हा तेल्हारा तालुक्यातील राहणार असल्याचे या बैठकीत सांगितले. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर व मनात्री येथे २०१६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. या कॅम्प करीता आवश्यक सर्व नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आली होती.२०० एकर जागा सुद्धा उपलब्ध करण्यात आली होती. परंतु नुकत्याच मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत तालुक्यातील बटालियन अकोला तालुक्यातील शिसा उदेगाव, हिगंणा शिवारात जागा उपलब्ध करून मंजुरात देण्यात आली. या निर्णयामुळे अकोट मतदारसंघातील अकोट-तेल्हारा तालुक्यामध्ये चांगलाच रोष निर्माण झाला होता. अकोट-तेल्हारा तालुक्यातील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी एकत्र येऊन बटालियन कँम्प तेल्हारा तालुक्यात कायम ठेवण्याची मागणी लावून धरली. बटालियन कॅम्प बचाव कृती समिती तयार करण्यात आली होती. बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातील इतरत्र हल्ल्यानंतरही अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मौनव्रत धारण करून बटालियन कँम्पबाबत आपली भूमिका जनतेसमोर का माध्यमासमोर स्पष्ट केली नव्हती. तर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनीसुद्धा याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले होते. परंतु कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट करून देऊन हा कॅम्प तेल्हारा तालुक्यातच राहणार असे डॉ पाटील यांनी आश्वासित केले होते. पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला प्रदीप वानखडे , दिलीप बोचे, संजीवनी बिहाडे, रामाभाऊ फाटकर,एकनाथ ताथोड,डाँ विनीत हिंगणकर,भानुदास वाघोडे, चंदू दुबे, गजानन थोरात, देवानंद नागले, शंकर डिघोळे, विलास ताथोड, अंनत मनतकर, रमेश ताथोड, प्रताप शिंदे ,संतोष वाकोडे,विष्णु ताथोड,कैलास मनतकार, निशांत ताथोड, प्रशांत विखे,आशिष ताथोड ,अंनत ताथोड,विठ्ठल सरप, डॉ अशोक बिहाडे यांची उपस्थिती होती.