भारताचा पहिला हुमोनॉइड यंत्रमानव येणार अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:45 PM2020-03-06T13:45:25+5:302020-03-06T13:45:36+5:30
यंत्रमानव(रोबोट) ‘इंद्रो’ अकोल्यातील शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बाभूळगाव येथे ७ मार्च रोजी येणार आहे.
अकोला: भारताचा पहिला हुमोनॉइड अर्थात माणसासारखा कृतीशील यंत्रमानव(रोबोट) ‘इंद्रो’ अकोल्यातील शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बाभूळगाव येथे ७ मार्च रोजी येणार आहे. त्यानिमित्ताने महाविद्यालयात टेक्नॉब्लिट्झ २0२0 हा टेक्निकल उपक्रमसुद्धा आयोजित केला आहे.
‘इंद्रो रोबोट’ हा अकोल्यात येत असल्याने नागरिक, विद्यार्थ्यांना या यंत्रमानवाची भेट घालून संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. हा यंत्रमानव स्वयंचलित असून, तो कसा चालतो, बोलतो, कसा काम करतो हे सुद्धा विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. ही अकोलेकरांसाठी मोठी उपलब्धी आहे. यासोबतच विविध भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पेपर प्रझेंटेशन, प्रोजेक्ट व मॉडेल एक्स्पो,रोबो रेस, ब्लाइंड रेस, टॅलेंट हंट, आयपीएल आॅक्शन,पबजी, एनएफएस, कॉल आॅफ ड्युटी या अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत, तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात येणार आहे. विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे ‘हुमोनॉइड रोबोट शो’. हा शो ७ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. यादरम्यान अकोलेकर नागरिक, शाळेतील विद्यार्थी,या रोबोटशी संवाद साधू शकतील. इंद्रो यंत्रमानवाच्या अकोला भेटीचा अकोलेकर नागरिकांसह विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे महाविद्यालयाचे आवाहन प्राचार्य डॉ.एस. के.देशमुख, समन्वयक डॉ. एस.एल. सातारकर, प्रा. एस.ए. अवचार यांनी केले आहे.