‘व्हॅट आॅडिट’ची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 06:27 PM2019-01-08T18:27:27+5:302019-01-08T18:28:06+5:30
अकोला : मागील आर्थिक वर्षातील ‘व्हॅट आॅडिट’ची मुदत आगामी २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत वाढविल्या जात असल्याचे संकेत आहेत.
अकोला : मागील आर्थिक वर्षातील ‘व्हॅट आॅडिट’ची मुदत आगामी २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत वाढविल्या जात असल्याचे संकेत आहेत. देशभरातील जीएसटी आयुक्तांसह आणि कर सल्लागारांचे प्रस्ताव केंद्रीय वित्तीय सचिवालयात पोहोचले आहेत. त्यामुळे ‘व्हॅट आॅडिट’ वाढविल्या गेल्याची मुदत लवकरच जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत.
‘व्हॅट आॅडिट’ची मुदत वाढवून देण्यात यावी म्हणून आयुक्त आणि कर सल्लागारांचे प्रस्ताव केंद्रीय वित्त सचिवालयाकडे पोहोचल्याने केंद्र शासन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात अधिसूचना तयार केली गेली असून, न्यायिक व संबंधित विभागाकडूनही त्याला हिरवी झेंडीदेखील मिळाली आहे. केंद्रीय वित्तमंत्र्यांची स्वाक्षरी होताच याबाबतचा आदेश निघणार असल्याचे बोलले जात आहे. ‘व्हॅट आॅडिट’ची मुदत वाढविण्यासंदर्भात अनेक व्यापारी, उद्योजक आणि करदाते संभ्रमात आहेत. जुलै २०१९ पासून देशभरात जीएसटी कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने मागील अनेकांचे ‘व्हॅट आॅडिट’ रखडले. त्यासाठी वारंवार तारखा दिल्या गेल्यात; मात्र अजूनही ‘व्हॅट आॅडिट’ची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. दरम्यान, करदाते, कर सल्लागार यांनी आयुक्तांकडे ‘व्हॅट आॅडिट’ची तारीख वाढविण्याची मागणी केली होती. आयुक्तांकडूनदेखील वित्त मंत्रालयाकडे तसा प्रस्ताव पाठविला गेला होता. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचा विचार सुरू आहे.