कृषी, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात औद्योगिक विकास साधावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:35 PM2019-03-16T13:35:44+5:302019-03-16T13:36:11+5:30
अकोला: कृषी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये औद्योगिक विकास विषयावर दोन दिवसीय पहिल्या आंतरराष्टÑीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांच्या हस्ते झाले.
अकोला: कृषी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये औद्योगिक विकास विषयावर दोन दिवसीय पहिल्या आंतरराष्टÑीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांच्या हस्ते झाले. अक्षय ऊर्जेचा वापर करू न शेती, उद्योग व्यवसाय निर्मितीवर येथे तज्ज्ञांचा सूर उमटला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित परिषदेत इंडियन सोसायटी आॅफ अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे अध्यक्ष प्रा. इंद्रमणी, नवी दिल्ली यांनी ऊर्जा क्षेत्रात उद्योग निर्मिती व रोजगाराच्या संधी निर्माण करणे, ही देशापुढची महत्त्वाची गरज असल्याने त्यादृष्टीने काम करावे लागणार आहे. यानुषंगाने निवडलेला आंतरराष्टÑीय परिषदेचा विषय दिशा देणारा ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे राष्टÑीय समन्वयक डॉ. आर. बी. शर्मा यांनी आंतरराष्टÑीय परिषद विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी नव्हे, उद्योगासाठी नवी दिशा देणारे उद्योजक होण्यासाठी मानसिक विकास घडविणारी ठरत असल्याने परिषदांचे आयोजन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. या माध्यमातून पुढील काळात विद्यार्थ्यांमधूनच उद्योजक निर्माण होतील, असा आशावाद व्यक्त करताना, कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाद्वारे कमी कालावधीत या पद्धतीचे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी ऊर्जा व औद्योगिक विकास यावर विचार मांडले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवन यांनी ही कृषी, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात औद्योगिक विकास साधून विद्यार्थ्यांमधून उद्योजक निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे व या परिषदेचे आयोजक तथा प्रमुख अन्वेषक डॉ. एस. आर. काळबांडे यांनी परिषद घेण्यामागील उद्देश समजावून सांगितला. राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पात कर्मचारी तथा विद्यार्थ्यांच्या क्षमता बांधणी व कौशल्य विकास यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे सांगितले. या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रातील व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील औद्योगिक विकासावर जागृती करण्यात येत असल्याचे नमूद केले. परिषदेला नवी दिल्लीचे राहुल श्रीवास्तव, गुजरातचे डॉ. रामकिशोर सिंह, हैदराबादचे विजय नदीमती, ओमान येथील डॉ. पंकज पाथे्र यांची उपस्थिती होती.
परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रा. विवेक खांबलकर यांनी मानले. प्रा. धीरज कराळे व कर्मचाऱ्यांनी परिषदेसाठी सहकार्य केले.